सौदी तयार करणार 1 लाख एआय योद्धे

आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) तथा कृत्रिम बुद्धिमत्तेने जग पूर्णपणे बदलून टाकले आहे. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वच क्षेत्रातील कंपन्या एआयचा वेगाने अवलंब करत आहेत. सौदी अरेबियानेही यात आघाडी घेतली आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तब्बल 1 लाख योद्धे तयार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सौदीने आखली आहे. सौदीच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक लाख नागरिकांना एआय आणि डेटा कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी ’इनकोर्टा’च्या सहकार्याने होणारी एआय क्षेत्रातील आतापर्यंतची ही सर्वात मोठा प्रशिक्षण मोहीम आहे.
Comments are closed.