‘जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे’, लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?’ कॉक्रोच जनत

CJP सौरव दास जेपी नड्डा दिल्ली: ‘जेपी नड्डा (J. P. Nadda) यांना लाज वाटली पाहिजे. लोक 30 दिवसांहून अधिक काळ इथे ( जंतर मंतरवर) बसले आहेत.विद्यार्थ्यांची डोकी फोडली. आम्ही नाही तर तेच राजकारण करत आहेत. आम्ही तर म्हणतो ते त्यांनी राजकारण करावं, राजकारणात आपण लोकांसाठी काम करतो, लोकांचं म्हणणं ऐकतो. मला एक कळत नाही, सरकारच्या मनात नेमकं काय आहे. लाखो लोक इथे जमले आहे. सरकारच्या विरोधात किती निराशा आहे. केवळ इथेच नाही तर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहे. जेव्हा पासून दिल्ली पोलिसांनी (दिल्ली पोलीस) लाठीचार्ज केला, लोकांची डोकी फोडली यावरून अनेक विरोधी अभिप्राय उमटीत्यामुळे आहे. ऐरवी बोलत असतात ते चाणक्य नीती आहे, तर काय हि तुमची चाणक्य नीती आहे च्या? असे असेल तर तुम्ही दूर व्हाधर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांचा राजीनामा वाटाघाटीचा विषय नाही. त्याशिवाय आंदोलन सुरूच राहील. जोपर्यंत ते सुरू ठेवावे लागेल, तोपर्यंत ते सुरूच राहील.” असा इशारा देत कॉक्रोच जनता पक्षाचे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरभ दास (Saurav Das) यांनी सरकारवर टीका केली आहे.

Saurav Das : सत्ताधारी पक्षाने पेरलेले समाजकंटक घुसखोरी करून संपूर्ण आंदोलन भरकटवतात,

CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास पुढे म्हणाले म्हणाले च्या“मी आज सोनम वांगचुक यांच्याशी अनेकदा बोललो. या शांततापूर्ण आंदोलनाने शांततापूर्णच राहिले पाहिजे, असा निष्कर्ष निघाला. त्यांनी सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि हे आंदोलन योग्य रीतीने करण्याचे जाहीर आवाहनही केले आहे. या देशातील पूर्वीच्या आंदोलनांमध्ये सत्ताधारी पक्षाने पेरलेले समाजकंटक घुसखोरी करून संपूर्ण आंदोलन भरकटवतात, आणि मग शेवटी शांततेने आंदोलन करणाऱ्यांनाच दोष दिला जातो, आणि असे होता कामा नये.”

जेपी नड्डा: जेपी नड्डा नेमकं काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी बुधवारी (22 जुलै) पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थी आंदोलने, विरोधी पक्ष, सोनम वांगचुक आणि संसदेतील चर्चा यासह अनेक विषयांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, विद्यार्थी आंदोलनाचे राजकारण करू नये. त्यांनी काँग्रेसवर राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

तर केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की, सरकार नीट (NEET) संबंधित मुद्द्यावर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी असेही सांगितले की, विरोधी पक्षांनी चर्चेसाठी वेळ निश्चित करावी. आम्ही ठरलेल्या वेळेत अर्थपूर्ण चर्चेसाठी तयार आहोत. या सर्व मुद्द्यांवर आता CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी प्रत्युत्तर देत अभिप्राय दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.