RBI नं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर घटवले
नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं कर्जाच्या व्याज दरात कपातीचा निर्णय घेतला आहे. एसबीआयकडून 25 बेसिस पॉईंटनं व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं गेल्या आठवड्यात रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी करुन 5.25 टक्क्यांवर आणला गेला होता. त्याचा फायदा कर्जदारांना देण्यासाठी एसबीआयनं हा निर्णय घेतला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियानं व्याज दरात कपात केल्यानं एक्सटर्नल बेंच मार्क लिंक्ड रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी होऊन 7.90 टक्क्यांवर आला आहे. हे दर 15 डिसेंबरपासून लागू केले जाणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2025 या कॅलेंडर वर्षात चौथ्यांदा रेपो रेपोटमध्ये कपात केली आहे. त्यामुळं रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 5.25 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळं स्टेट बँक ऑफ इंडियानं मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस्ड लेंडिंग रेट मध्ये सर्व प्रकारच्या कालावधीच्या कर्जासाठी व्याज दर 5 बेसिस पॉईंटनं कमी केला आहे. त्यामुळं तो दर 8.75 टक्क्यांवरुन 8.70 टक्क्यांवर आला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियानं बेस रेट किंवा बीपीएलआर 10 टक्क्यांवरुन 9.90 टक्क्यांवर आणला असून हे दर 15 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. याशिवाय स्टेट बँकेनं ठेवीवरील व्याज दरांमध्ये कपात केली आहे. 2 वर्षे ते 3 वर्षांच्या ठेवीसाठीचा दर 6.40 टक्के असेल.
स्टेट बँक ऑफ इंडियाशिवाय इंडियन ओव्हरसीज बँकेनं देखील व्याज दरात कपात केली आहे. हे दर 15 डिसेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. बँकेनं एबीएलआर दर जे रेपो लिंक्ड लेंडिंग रेटशी लिंक्ड असतात ते 25 बेसिस पॉईंटनं 8.35 वरुन 8.10 टक्क्यांवर आणले आहेत.
गृह कर्जदारांना दिलासा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये कपात केल्यानं आणखी काही बँकांनी व्याज दरात कपात केली आहे. एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडियासह इतर बँकांनी गृह कर्जाच्या व्याज दरात कपात केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 5 डिसेंबरला रेपो रेटमध्ये 5.50 टक्क्यांवरुन 25 बेसिस पॉईंटनं कपात करुन 5.25 टक्के केला आहे.
एचडीएफसी बँकेनं एमसीएलआर बेस्ड कर्जाचा व्याज दर 5 बेसिस पॉईंटनं कमी केली आहे. एचडीएफसी बँकेची एमसीएलआर रेटची रेंज 8.30 टक्के ते 8.55 टक्के असेल. हे व्याज दर कर्जाच्या कालावधीवर अवलंबून असतील. एचडीएफसी बँकेच्या एमसीएलआर व्याज दराची रेंज 8.35 ते 8.60 टक्के होती.
पंजाब नॅशनल बँकेनं रेपो लिंक्ज लेंडिंग रेट 8.35 टक्क्यांवरुन 8.10 टक्क्यांवर आणला आहे. बँक ऑफ इंडियानं बेंचमार्क रिटेल लोन लेंडिंग रेट 8.15 टक्क्यांवरुन 7.90 टक्क्यांवर आणला आहे. तर, इंडियनं बँकेनं रेपो लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेट 8.20 टक्क्यांवरुन 7.95 टक्क्यांवर आणला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.