कश्मीरमध्ये घोटाळा प्रीमियर लीग

कश्मीरमध्ये क्रिकेटचे नवे टॅलेंट शोधण्याच्या उद्देशाने सुरू झालेली इंडियन हेवन प्रीमियर लीग (आयएचपीएल) अखेर मोठा घोटाळा ठरली आहे. लीगचे आयोजक अचानक फरार झाल्याने ख्रिस गेल, शाकिब हसन, जेसी रायडर यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मानधन न मिळाल्याने श्रीनगरमधील हॉटेलमध्ये अडकले होते.

ऑक्टोबरच्या शेवटी भव्य सोहळय़ाने सुरू झालेली ही लीग मोहालीस्थित ‘युवा सोसायटी’ या संस्थेने आयोजित केली होती. श्रीनगर सुल्तान्स, जम्मू लायन्स, लडाख हिरोज, पुलवामा टायटन्स, उरी पँथर्स, गुलमर्ग रॉयल्स, पटनीटॉप वॉरियर्स आणि किश्तवाड जायंट्स अशा आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत एक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही खेळत होता.

या लीगच्या बहुतांश लढती बक्षी स्टेडियमवर खेळवण्यात आल्या, पण या लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यंत फिका होता. आयोजकांनी तिकिटांवर सवलत दिली, सोशल मीडियावर प्रचार केला, पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. अखेर पेमेंट थकबाकीमुळे खेळाडूंनी सामन्यात उतरण्यास नकार दिला. परिणामत: लीगच्या आयोजकांना तेथून पळ काढावा लागला. कश्मीर स्पोर्ट्स काwन्सिलचे सचिव नुजहत गुल यांनी ‘आमचा लीगशी काही संबंध नसल्याचे सांगितले.

Comments are closed.