सहलीच्या बसला आंबेनळी घाटात अपघात;विद्यार्थी, शिक्षक बचावले

विद्यार्थ्यांना घेऊन सहलीला जाणाऱ्या बसचा पोलादपूरच्या आंबेनळी घाटात अपघात झाल्याची घटना सकाळी समोर आली आहे. घाटातून बस खाली येत – असताना रस्त्यालगत असलेल्या न खोदकामाच्या खड्ड्यात बसचे न चाक रुतल्याने हा अपघात घडला. मात्र सुदैवाने डोंगराच्या दिशेला बस कलंडल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक बचावले आहेत. या अपघातामुळे घाटात वाहतूककोंडी झाली होती.

प्रतापगडाच्या दर्शनानंतर आंबेनळी घाटातून महाबळेश्वरकडे जात असताना घाटातील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने एका खासगी शाळेची बस खड्यात अडकली. या किरकोळ अपघातानंतर बसमध्ये असलेले विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच इतर वाहनचालकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. प्रथम विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बस बाहेर काढण्यात आले. दरम्यान, काही वेळानंतर क्रेनच्या सहाय्याने बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत झाली.

प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करावी
आंबेनळी घाट हा पर्यटक, शालेय सहली तसेच अवजड वाहनांसाठी नेहमीच वर्दळीचा आहे. मात्र घाटातील वळणे आणि खबरदारी न घेतल्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे घाटमार्गावर जाणाऱ्या शालेय बसेस व पर्यटक वाहनांसाठी अनुभवी चालकांची नियुक्ती करावी तसेच वाहतूक सुरक्षेसाठी प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Comments are closed.