टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी आणखी एका संघाची घोषणा, पहिलाच सामना वेस्ट इंडीजविरुद्ध

आयसीसी पुरुष टी20 वर्लडकप 2026 साठी स्कॉटलंडने आपल्या 15 सदस्यीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. बांग्लादेशला स्पर्धेतून बाहेर करण्यात आल्यानंतर स्कॉटलंडला ही सुवर्णसंधी मिळाली आहे. अनुभवी अष्टपैलू रिची बेरिंगटन याच्याकडे स्कॉटलंड संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मुख्य संघासोबत जैस्पर डेविडसन आणि जॅक जार्विस यांचा ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला असून, मॅकेंझी जोन्स, क्रिस मॅकब्राइड आणि चार्ली टियर यांना नॉन-ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून निवडण्यात आले आहे.

टी20 वर्लडकप 2026 मध्ये स्कॉटलंडचा समावेश ‘ग्रुप C’ मध्ये करण्यात आला आहे. या गटात स्कॉटलंडसोबत वेस्ट इंडीज, इंग्लंड, इटली आणि नेपाळ हे संघ आहेत. विशेष म्हणजे, स्कॉटलंडसाठी तोच सामना ठेवण्यात आला आहे, जो आधी बांग्लादेशसाठी निश्चित होता. स्कॉटलंड आपले सर्व लीग सामने भारतात खेळणार असून, त्यापैकी तीन सामने कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगणार आहेत. तर शेवटचा लीग सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

स्कॉटलंडचा टी20 वर्ल्डकप 2026 वेळापत्रक
7 फेब्रुवारी 2026 – स्कॉटलंड विरुद्ध वेस्ट इंडीज (दुपारी 3 वाजता, ईडन गार्डन्स, कोलकाता)
9 फेब्रुवारी 2026 – स्कॉटलंड विरुद्ध इटली (सकाळी 11 वाजता, ईडन गार्डन्स, कोलकाता)
14 फेब्रुवारी 2026 – स्कॉटलंड विरुद्ध इंग्लंड (दुपारी 3 वाजता, ईडन गार्डन्स, कोलकाता)
17 फेब्रुवारी 2026 – स्कॉटलंड विरुद्ध नेपाळ (संध्याकाळी 7 वाजता, वानखेडे स्टेडियम, मुंबई)

स्कॉटलंडने टी20 वर्ल्डकपसाठी थेट पात्रता मिळवली नव्हती. युरोपियन क्वालिफायरमध्ये इटलीकडून पराभव पत्करावा लागल्याने संघ स्पर्धेबाहेर गेला होता. मात्र, बांग्लादेशने भारतात सामने खेळण्यास सुरक्षेच्या कारणास्तव नकार देत ठिकाण बदलण्याची मागणी केली. आयसीसीने ही मागणी फेटाळल्यानंतर बांग्लादेशला स्पर्धेतून वगळण्यात आले आणि स्कॉटलंडला पुन्हा एकदा वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

स्कॉटलंडचा संघ:
रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅडली करी, ऑलिव्हर डेव्हिडसन, ख्रिस ग्रीव्हज, जैनुल्ला इहसान, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, फिनले मॅकक्रेथ, ब्रँडन मॅकमुलन, जॉर्ज मुन्से, सफियान शरीफ, मार्क वॅट, ब्रॅडली व्हील.

प्रवासी राखीव खेळाडू: जॅस्पर डेव्हिडसन, जॅक जार्विस.

गैर प्रवासी राखीव खेळाडू: मॅकेन्झी जोन्स, ख्रिस मॅकब्राइड, चार्ली टीयर.

स्कॉटलंड संघासाठी ही संधी मोठी असून, बलाढ्य संघांविरुद्ध स्वतःची छाप पाडण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

Comments are closed.