संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे
पहिल्याच दिवशी लोकसभा अध्यक्षांविरोधातील प्रस्तावावर चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवार, 9 मार्चपासून सुरू होणार आहे. हा टप्पा 2 एप्रिलपर्यंत चालणार असून अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच दिवशी लोकसभा अध्यक्षांना हटवण्यासंबंधीच्या प्रस्तावावर चर्चा अपेक्षित आहे. या प्रस्तावावरील चर्चेच्या निमित्ताने भाजप आणि काँग्रेस दोघांनीही त्यांच्या लोकसभा खासदारांना 9 ते 11 मार्चपर्यंत सभागृहात उपस्थित राहण्यास व्हीप जारी केला आहे. सभागृहातील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक ‘हल्ले’ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सभागृहाचे कामकाज चालवताना सभापती बिर्ला यांनी पक्षपाती दृष्टिकोन स्वीकारला आणि विरोधी नेत्यांना बोलण्याची संधी दिली नाही असा आरोप आहे.
Comments are closed.