सीमा हैदरवरील हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध? वकीलांचा मोठा दावा, काळ्या जादूचा संदर्भ देत म्हणाले
सीमा हैदर: ग्रेटर नोएडा येथील सीमा हैदरच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केल्यानंतर, तिचे वकील एपी सिंह यांनी आता मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी या संपूर्ण घटनेला कट रचल्याचं म्हटलं आहे आणि दावा केला आहे की, पाकिस्तानमध्ये सीमाविरुद्ध कट रचला जाऊ शकतो. पाकिस्तानहून आपला प्रियकर सचिनसाठी भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका तरूणाने जबरदस्तीने सीमा आणि सचिन यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, जेव्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्याने ‘काळ्या जादूच्या’ प्रभावाखाली असल्याचा दावा केला. आता या प्रकरणावर सीमाचे वकील एपी सिंह यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि संपूर्ण घटनेला कट रचल्याचं म्हटलं आहे.
सीमावरील हल्ला हा एका व्यक्तीचा कट नसून तो..
व्हिडीओमध्ये सीमाचे वकील एपी सिंह म्हणाले की, सीमा हैदर ही एक कट्टर सनातनी महिला बनली आहे आणि ती हिंदू धर्माच्या रीतिरिवाजांचे पूर्णपणे पालन करते. त्याचबरोबर सीमाच्या वकीलांनी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिस प्रशासनावर विश्वास व्यक्त केला आहे. वकील एपी सिंह यांच्या मते, सीमावरील हल्ला हा एका व्यक्तीचा कट नसून तो एका कटाचा भाग असू शकतो, जो पाकिस्तानात किंवा भारतातील अशा लोकांनी रचला आहे ज्यांना सीमा आणि तिचा पती सचिन आवडत नाहीत.
हा एक सुनियोजित कट
सीमाचे वकील एपी सिंह यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण हा फक्त एक मोहरा असू शकतो, ज्याला कोणीतरी येथे पाठवले आहे. त्याचबरोबर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सीमा हैदर कोणत्याही प्रकारच्या काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही. सीमा आता पूर्ण सनातनी झाली आहे आणि सर्व सण आणि परंपरा पाळत आहे. हा एक सुनियोजित कट आहे. अटक झाल्यानंतर आरोपी तरुणाने काळ्या जादूबद्दल सांगितलं. सीमाच्या घरी पोहोचलेल्या त्या तरूणाने ज्या पद्धतीने काळ्या जादूबद्दल वक्तव्य केलं ते पोलिसांसाठी गोंधळात टाकणारे आहे.
एपी सिंह पुढे म्हणाले की, सीमा हैदर पूर्णपणे सनातनी झाली आहे. ती एक कट्टर हिंदू बनली आहे आणि हिंदू धर्मात काळ्या जादूला स्थान नाही. सीमा हैदर काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाहीत, परंतु त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर पूर्ण विश्वास आहे. सीमा हैदर सनातन धर्माचे सर्व सण साजरे करत आहे, या गोष्टीचा तिच्यावर अजिबात परिणाम होणार नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि पोलिस सर्व पैलू तपासत आहेत.
अधिक पाहा..
Comments are closed.