Raigad News – खोपोलीत शिंदे गटाच्या नगरसेविका सीमा काळोखे यांच्या पतीची हत्या, घटनेने खळबळ

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडत असताना खोपोलीत मोठी घटना घडली आहे. खोपोलीत शिंदे गटाच्या नगरसेविका सीमा काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आली आहे. मुलीला शाळेत सोडून परतत असताना खोपोलीतील जया बारजवळ तलवार आणि चॉपरने वार करून मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. राजकीय वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Comments are closed.