विराट कोहलीच्या निवृत्तीवर वीरेंद्र सेहवाग यांचं वक्तव्य! म्हणाले तो अजून…
टीम इंडियाचा (team india) स्टार फलंदाज विराट कोहलीने (virat kohli) कसोटी क्रिकेटमधून(test cricket) निवृत्ती घेतली या गोष्टीवर अजून काही चाहत्यांचा विश्वास बसत नाही. जास्त लोकांचे हेच म्हणणे आहे की, त्याने निवृत्ती मागे घेऊन पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये परत यावे. तसेच काही माजी भारतीय क्रिकेटर यांचे सुद्धा म्हणणं आहे की, विराट कोहलीने खूप लवकर निवृत्ती जाहीर केली. ज्यामध्ये वीरेंद्र सेहवाग (virendra sehwag) यांचं सुद्धा नाव सामील आहे. सेहवाग यांनी कोहलीच्या निवृत्तीवर पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केलं आहे. जाणून घ्या ते काय म्हणाले?
आयपीएल 2025 स्पर्धेत 23 मे रोजी हैदराबाद आणि आरसीबीमध्ये (RCB vs SRH) खेळलेल्या सामन्यात विराट कोहलीने 43 धावांची चांगली पारी खेळली. ती पाहून पुन्हा एकदा सेहवाग म्हणाले की, तो अजून दोन वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकत होता. निश्चित स्वरूपात मला वाटते की, त्याने कसोटी फॉर्मेट मधून खूप लवकर निवृत्ती जाहीर केली. ज्या प्रकारे तो त्याची फिटनेस चांगल्या पद्धतीने बनवून ठेवतो, तो सहजपणे दोन वर्षांपर्यंत खेळू शकला असता. पण विराट स्वतःच या निर्णयाच्या मागचं कारण सांगू शकतो. हा खेळाडूचा व्यक्तिगत निर्णय असतो. तो त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे किंवा कदाचित तो थकलेला असावा.
आयपीएल 2025 नंतर टीम इंडियाला जूनमध्ये इंग्लंडचा दौरा करायचा आहे, जिथे भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत आधीच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.
12 मे रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. (Virat kohli test retirement) तसेच विराट आधी रोहित शर्माने (rohit sharma) 7 मे रोजी सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत या फॉरमॅटमधून निवृत्ती घोषित केली. या दोन्ही दिग्गजांच्या निवृत्तीमुळे चाहत्यांना मोठा झटका बसला आहे.
Comments are closed.