Select USA 2026 अमेरिकेला हवी परदेशी गुंतवणूक; व्यवसायाचा विस्तार करण्याची मोठी संधी
अमेरिकेतील वाढती महागाई, नोकऱ्यांची कमतरता, अमेरिकेबाहेर होणारे उत्पादन या सगळ्यांमुळे अमेरिकेची महासत्ता धोक्यात आली आहे. अशातच अमेरिकेला पुन्हा एकदा उंचीवर नेण्यासाठीचे आश्वासन देत ट्रम्प सरकार सत्तेत आले. मात्र ट्रम्प सरकारची आतापर्यंतची वाटचाल वादग्रस्त राहिली आहे. याच दरम्यान अमेरिका गुंतवणुकदारांना आपल्या देशात अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकी सरकारने गुंतवणुकदारांसाठी सिलेक्ट यूएसए २०२६ (Select USA 2026) समिटच्या कार्याक्रमाचे आयोजन केले आहे.
या समिटमध्ये एकाच छत्राखाली संपूर्ण अमेरिकेतून आर्थिक विकासक, सेवा पुरावठादार आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ येणार आहेत. ३ मे ते ६ मे २०२६ या कालावधीत नॅशनल हार्बर, मेरीलँड (National Harbor, Maryland) या समिटचे आयोजन करण्यात आले आहे.
युनायटेड स्टेट्समध्ये तुमचा व्यवसाय वाढवण्यास तयार आहात? 2026 ला उपस्थित रहा @SelectUSA गुंतवणूक समिट आणि प्रदर्शन हॉल एक्सप्लोर करा, देशभरातील प्रतिनिधींसह.
हजारो आर्थिक विकासक, सेवा प्रदाते आणि उद्योग तज्ञांसह नेटवर्क… pic.twitter.com/6jchhI0XoX
– यूएस कॉन्सुलेट मुंबई (@USAndMumbai) 24 मार्च 2026
अमेरिकेत व्यवसाय वृद्धीसाठी हे समिट महत्त्वाचे ठरू शकते. सरकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी थेट संपर्क साधून अमेरिकेमधील उद्योग पायाभूत सुविधांची माहिती घेण्यासाठी याचा निश्चित फायदा होऊ शकतो, अशी माहिती मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाने दिली आहे.
या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी selectusasummit.us या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल.
Comments are closed.