वासुदेव कदम हरवले आहेत

कांदिवली पूर्व आकुर्ली रोड येथील जानूपाडयाच्या नारायण गवारे चाळीतील ज्येष्ठ रहिवासी वासुदेव कदम (77) हे रपेट मारायला घरातून बाहेर पडल्यानंतर हरवले आहेत. गेल्या सवा महिन्यापासून त्यांचे कुटुंब त्यांचा शोध घेत आहे.
वासुदेव कदम हे 24 जानेवारी रोजी घरातून बाहेर पडले. मात्र त्यानंतर ते अद्यापही परतलेले नाहीत. त्यांचा वर्ण सावळा असून उंची पाच फूट दोन इंच इतकी आहे. केस पांढरे आहेत व सडपातळ बांधा आहे. घरातून बाहेर पडताना त्यांनी गुलाबी रंगाचा टीशर्ट व काळ्या रंगाची हाफ पॅण्ट घातली होती. त्यांच्या डोळ्याला मोतीबिंदूही झाले आहे. मानेजवळ डाव्या बाजूला ऑपरेशन झाल्याचे व्रणही आहे. ते हरवल्याची तक्रार समतानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वासुदेव कदम यांचा शोध लागल्यास कृपया संपर्क साधावा, गणेश कदम 9969359346.
Comments are closed.