कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व उपनिरीक्षक ट्रॅप, एक लाख घेताना रंगेहाथ सापडले
पोलीस ठाण्यात दाखल दोन प्रकरणे मिटविण्यासाठी तीन लाखांची मागणी करून उर्वरित एक लाख घेताना कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व उपनिरीक्षक ट्रप झाले. दोघेही पकडले गेल्यानंतर वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमध्ये सहा लाखांची रोकड मिळून आली.
तक्रारदाराच्या विरोधात कुरार पोलीस ठाण्यात दोन तक्रार दाखल होत्या. या तक्रारींमध्ये कारवाई न करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक संजीव तावडे व उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने यांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने दोन लाख दिले होते. त्यानंतर उर्वरित एक लाख लवकर द्यावे अशी मागणी अधिकाऱयांकडून करण्यात येत होती, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने पोलीस ठाण्यात सापळा लावला. तेव्हा जुन्ने यांना एक लाख स्वीकारताना रंगेहाथ पकडले. वरिष्ठ निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.
Comments are closed.