ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय उर्फ नाना पिसाट यांचे निधन

ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडणारे टिटवाळा येथील ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय ऊर्फ नाना पिसाट यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने जनसामान्यांच्या समस्यांची जाण असणारा अभ्यासू पत्रकार हरपला आहे.
नाना पिसाट हे निष्ठावान शिवसैनिक होते. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण समितीवरही त्यांनी काही काळ काम केले. दैनिक ‘सामना’चे वार्ताहर म्हणूनदेखील त्यांनी टिटवाळा व परिसरातील अनेक प्रश्न मांडले होते. पिसाट यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Comments are closed.