ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे निधन

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गिरणगावची जडणघडण आणि मराठी नियतकालिकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार ज्येष्ठ पत्रकार आणि ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विशेष स्नेह त्यांना लाभला. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या मुशीत पत्रकारितेचे धडे गिरवलेल्या सावंत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून गिरणी संपापर्यंत विविध विषयांवर लेखन केले.  त्यांच्या निधनाने ध्येयवादी पत्रकारितेचा अध्याय संपल्याची हळहळ व्यक्त होत आहे.

लयबद्ध हस्ताक्षराचे संपन्न

पंढरीनाथ सावंत सुबक,  वळणदार, लयबद्ध आणि सुवाच्च हस्ताक्षराचे धनी होते. त्यांचे अक्षर एखाद्या छापील मजकुराप्रमाणे असायचे. कितीही पानांचा मजकूर असो, अथपासून इतिपर्यंत अक्षराचे वळण बदलत नसे. वयोमानानुसार हाताला कंप सुटू लागला तरी त्यांनी लिखाणाचा सराव सोडला नाही.

Comments are closed.