इस्रायलच्या हल्ल्यात महिला पत्रकार ठार
इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात लेबनॉनमधील वरिष्ठ महिला पत्रकार अमल खलील यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहेत. हल्ला झाल्यानंतर मदतीसाठी धावलेल्या बचाव पथकावरही इस्रायलने हल्ला केला, असे लेबनॉनने म्हटले आहे. इस्रायल जाणीवपूर्वक लेबनॉनच्या पत्रकारांना लक्ष्य करत आहे, असे लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ औन म्हणाले. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेऊन जाऊ, असा इशारा लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी दिला. इस्रायली सैनिकांनी वर्षभरात 86 पत्रकारांची हत्या केली आहे, असे कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट (सीपीजे) च्या अहवालात म्हटले आहे.
Comments are closed.