बीएसएफ जवानने ठार केलेले वरिष्ठ अधिकारी

वादानंतर गोळीबार, आरोपीला अटक

वृत्तसंस्था/ मुर्शिदाबाद

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील एका सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) छावणीत वादानंतर जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या केली. शनिवारी रात्री साडेदहा वाजता धुलियान येथील छावणीत ही घटना घडली. जोरदार वादानंतर कॉन्स्टेबल शिवम कुमार मिश्राने आपले वरिष्ठ हेडकॉन्स्टेबल रतन सिंग शेखावत यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. बीएसएफने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले असून घटनेमागील नेमकी कारणे शोधली जात आहेत.

हल्लेखोर जवान आणि वरिष्ठ अधिकारी हे दोघेही मुर्शिदाबादमध्ये अलिकडच्या जातीय संघर्षानंतर या भागात तैनात असलेल्या बीएसएफ युनिटमध्ये तैनात होते. 56 वर्षीय शेखावत 1989 मध्ये बीएसएफमध्ये सामील झाले होते. ते दलाच्या 119 बटालियनमध्ये तैनात होते. ते राजस्थानमधील जयपूरचे रहिवासी होते. आरोपी जवानदेखील त्याच बटालियनचा होता.

Comments are closed.