भारत-इंग्लंड मालिकेचे टॉप-5 फलंदाज आणि गोलंदाज, सर्वाधिक धावा आणि विकेट्स कोणाच्या नावावर? पहा संपूर्ण यादी!
भारत वि इंग्लंड कसोटी मालिका: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 20 जूनपासून सुरू झालेली 5 सामन्यांची कसोटी मालिका आज (4 ऑगस्ट) रोजी समाप्त झाली. या मालिकेत शुबमन गिल, जो रूट, रिषभ पंत, यशस्वी जयस्वाल, बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रूकसह अनेक खेळाडूंच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. तर मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अटकिंसन, ख्रिस वोक्स यांसारख्या सर्व गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. या मालिकेत कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या आणि कोणी सर्वाधिक विकेट्स घेतल्या, त्याबद्दल जाणून घेऊयात. (India vs England Test Series Stats)
अँडरसन-तेंडुलकर मालिकेत फलंदाजांनी मोठ्या प्रमाणात धावा केल्या. या मालिकेत अनेक शतके पाहायला मिळाली. भारतीय कर्णधार शुबमन गिलच्या बॅटमधून द्विशतकही आले. या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये 5 पैकी 3 भारतीय आहेत. (Most Runs IND vs ENG Test)
शुबमन गिल 754 धावांसह या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. यासाठी गिलला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. गिलची या मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या 269 धावा राहिली. (Shubman Gill Man of the Series)
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. रूटने 9 डावांमध्ये 67.12च्या सरासरीने 537 धावा केल्या. रूटची सर्वोच्च धावसंख्या 150 धावा राहिला. (Joe Root Runs)
केएल राहुल या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. राहुलने 53.20च्या सरासरीने 532 धावा केल्या. (KL Rahul Performance)
रवींद्र जडेजाने संपूर्ण मालिकेत शानदार फलंदाजी करत या यादीत चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. जडेजाने 5 सामन्यांच्या मालिकेत 516 धावा केल्या. विशेष म्हणजे जडेजा 4 वेळा नाबादही परतला. (Ravindra Jadeja Batting)
या यादीत पाचव्या क्रमांकावर हॅरी ब्रूकचे नाव आहे. हॅरी ब्रूकने मालिकेत 53.44च्या सरासरीने 481 धावा केल्या, ज्यात 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. (Harry Brook Stats)
अँडरसन-तेंडुलकर मालिकेत फलंदाजांसोबतच गोलंदाजांचेही वर्चस्व राहिले. परंतु सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत मोहम्मद सिराजने सर्वांना मागे टाकले. बेन स्टोक्स ते जसप्रीत बुमराह या यादीत ‘डीएसपी’ सिराजच्या मागे राहिले. मात्र, या दोन्ही खेळाडूंनी सिराजच्या तुलनेत कमी सामने खेळले आहेत.
मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत 22 विकेट्स घेतल्या आहेत. सिराज मालिकेत 26 षटकांसह सर्वाधिक मेडन षटके टाकणारा गोलंदाजही ठरला. सिराजने संपूर्ण मालिकेत 1,113 षटके गोलंदाजी केली आहे. (Mohammed Siraj Bowling Stats)
सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत इंग्लंडचा गोलंदाज जोश टंग दुसऱ्या क्रमांकावर राहिला. टंगने 3 सामन्यांमध्येच 19 विकेट्स घेतल्या. (Josh Tongue Wickets)
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर बेन स्टोक्सचे नाव आहे. स्टोक्सने या मालिकेत 4 सामन्यांच्या 8 डावांमध्ये 17 विकेट्स घेतल्या. (Ben Stokes Wickets)
जसप्रीत बुमराहने या मालिकेत 3 सामने खेळले, ज्यात या दमदार गोलंदाजाने 14 विकेट्स घेतल्या. (Jasprit Bumrah Bowling Stats)
प्रसिद्ध कृष्णा देखील या मालिकेत तीनच सामने खेळू शकला, ज्यात या खेळाडूनेही 14 विकेट्स घेतल्या. (Prasidh Krishna Bowling Stats)
Comments are closed.