IND vs WI: टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका जिंकली, पण कर्णधार गिलच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित!
दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने वेस्टइंडीजला 7 गडी राखून पराभूत केले. या विजयासह भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. पहिल्या डावात फलंदाजांनी जबरदस्त खेळ करत 518 धावांचा डोंगर उभारला, तर दोन्ही डावात गोलंदाजांचंही प्रदर्शन तितकंच दमदार होतं.
मात्र, पहिली कसोटी मालिका जिंकूनही कर्णधार शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. वेस्टइंडीजच्या दुसऱ्या डावात 311 धावांवर त्यांचे 9 गडी बाद झाले होते. पण गिलच्या कमकुवत रणनीतीमुळे कॅरिबियन संघाने आपली धावसंख्या 390 पर्यंत नेली. सिराज-बुमराह, जडेजा आणि कुलदीप यांसारखे गोलंदाज असतानाही शेवटच्या विकेटसाठी वेस्टइंडीजने तब्बल 79 धावा जोडल्या.
कर्णधार म्हणून गिलला या सामन्यात झालेल्या चुका लक्षात घेऊन भविष्यात त्यातून नक्कीच शिकावं लागेल अशी चाहत्यांची अपेक्षा असेल.
Comments are closed.