Mumbai Tragedy – वांद्र्यात रहिवासी चाळ कोसळली; 7 जखमी, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मुंबईतील वांद्रे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. भारत नगर येथील नमाज कमिटी मशि‍दीच्या जवळ असणारी तीन मजली चाळ सकाळी पावणे आठच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना उपचारांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

शुक्रवारी सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. प्राथमिक तपासानुसार, इमारतीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यानंतर इमारतीचा काही भाग कोसळला. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 12 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

Comments are closed.