संघातून वगळलं, पण खचली नाही! फायनल मॅचमध्ये फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमकली; शेफाली वर्माच्या कमब
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम महिला विश्वचषक २०२५ : महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारताची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) जबरदस्त खेळी साकारली. तिने 87 धावांची आकर्षक खेळी करून संघाला दमदार सुरुवात करून दिली. शेफालीच्या या खेळीमुळे भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड घेतली. आज सर्वत्र तिच्या पुनरागमनाची चर्चा सुरू आहे, कारण असा ‘कमबॅक’ प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी आहे.
उपांत्य फेरीसाठी संघात परत बोलावले, आणि आज विश्वचषक अंतिम फेरीत महत्त्वपूर्ण खेळी खेळली. शेफाली वर्मा तू सौंदर्य 🔥🇮🇳 pic.twitter.com/Xd9ZEoZgiZ
— राजस्थान रॉयल्स (@rajasthanroyals) 2 नोव्हेंबर 2025
टीममधून बाहेर झाल्यानंतरही शेफाली थांबली नाही…
महिला विश्वचषक 2025 साठी निवड झालेल्या 15 जणींच्या भारतीय संघात शेफालीचे नाव नव्हते. त्या वेळी तिची फॉर्म आणि फिटनेसवर बरीच चर्चा होती. मात्र, शेफालीने निराश होण्याऐवजी देशांतर्गत क्रिकेटकडे वळून तिथे जबरदस्त कामगिरी केली. सतत रन काढत राहिली आणि आपले स्थान पुन्हा मिळवण्याची तयारी ठेवली.
प्रत्येक शॉट वाचतो. प्रत्येक आनंद वाचतो. शेफाली वर्मा तुमच्यासाठी. 🇮🇳✨#CWCFinal25 #WhistleForIndia pic.twitter.com/34AbDYcnm1
— चेन्नई सुपर किंग्स (@ChennaiIPL) 2 नोव्हेंबर 2025
प्रतिका रावलच्या दुखापतीनंतर मिळाली संधी
बांगलादेशविरुद्धच्या लीग स्टेजमधील अखेरच्या सामन्यात भारतीय ओपनर प्रतिका रावल फील्डिंगदरम्यान जखमी झाली. त्यामुळे ती संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडली. या संधीचा फायदा घेत शेफालीला पुन्हा टीममध्ये बोलावण्यात आले आणि तिने हे संधीचं सोनं केलं.
फायनलमधील धमाकेदार खेळी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये शेफाली वर्माने स्मृती मंधानासोबत शतकी भागीदारी केली. या जोडीने भारतासाठी 102 धावांची भक्कम सलामी भागीदारी रचली. शेफालीने 78 चेंडूंमध्ये 87 धावा करत 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. तिच्या या इनिंगने भारताला विजयाची भक्कम पायरी मिळवून दिली.
एकेकाळी असे वाटत होते की भारतीय संघ 250 धावांपर्यंत पोहोचेल, परंतु मधल्या फळीतील घसरगुंडी आणि संथ फलंदाजीमुळे ते शक्य झाले नाही आणि भारतीय संघ फक्त 298 धावांपर्यंत पोहोचू शकला. महिला एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे आणि विश्वचषक अंतिम सामन्यातील भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे.
शेफाली वर्मा.
बस्स, हेच कॅप्शन.#INDWvRSAW #CWC25FINAL pic.twitter.com/taKzhGK0QX
— कोलकाता नाइटराइडर्स (@KKRiders) 2 नोव्हेंबर 2025
फलंदाजीनंतर शेफाली वर्माही गोलंदाजीत चमकली
फलंदाजीनंतर शेफाली वर्माही गोलंदाजीत चमकली. तिने तिच्या दोन षटकांत दोन मोठ्या विकेट्स घेतल्या. शेफाली वर्माने आधी सून लुस आणि नंतर अनुभवी मॅरिझाने कॅपला बाद केले. कॅप फक्त चार धावा करू शकली. त्याआधी शेफालीने लुस आणि वोल्वार्ड यांच्यातील अर्धशतकी भागीदारी मोडली होती. शेफालीने स्वतःच्या गोलंदाजीवर लुसचा झेल घेतला. ती फक्त 25 धावा करू शकली. लुस आणि वोल्वार्ड यांनी 52 धावांची भागीदारी केली.
गोलंदाजीत किती बदल आहे 😍
शेफाली वर्मा यांनी आता ए #CWC25 तिच्या नावाची विकेट 🥳
अपडेट्स ▶ https://t.co/TIbbeE4ViO#TeamIndia | #WomenInblue | #INDvSA | #फायनल | @TheShafaliVerma pic.twitter.com/Sz8WaWfasR
— BCCI महिला (@BCCIWomen) 2 नोव्हेंबर 2025
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.