लंडनमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे!’

शाहरुख खान आणि काजोल यांच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने लंडनच्या लीसेस्टर स्क्वायरमध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण शाहरुख आणि काजोल यांच्या हस्ते करण्यात आले. लीसेस्टर स्क्वायरमध्ये जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांची स्मारके उभारण्यात आलेली आहेत. त्यात आता शाहरुख-काजोल यांच्या पुतळ्याची भर पडली आहे. ‘दिलवाले दुल्हनिया…’ हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी आजही अनेकांच्या ओठावर आहेत.

Comments are closed.