‘किंग’च्या सेटवरून शाहरुख खानचा नवा लूक लीक; केप टाऊनमधील शुटिंगचा व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरून सातत्याने काही फोटो आणि व्हिडीओ लीक होत असल्याने निर्मात्यांची चिंता वाढली आहे. नुकताच दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमधील शुटिंगचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यात शाहरुख खानचा जबरदस्त डॉन लूक पाहायला मिळत आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये शाहरुख खान एका लक्झरी कारमधून पिस्तूल काढताना दिसत आहे. या सेटवर अनेक महागड्या गाड्यांची ताफाही पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी शाहरुखच्या लूकचे भरभरून कौतुक केले असून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरेल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘किंग’च्या सेटवरून शाहरुख आणि दीपिका पदुकोण यांचे काही फोटो लीक झाले होते. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी चाहत्यांना विनंती केली होती की, सेटवरील कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका. मात्र दिग्दर्शकांच्या या आवाहनानंतरही पुन्हा एकदा शुटिंगचा व्हिडीओ लीक झाल्याने मेकर्सची डोकेदुखी वाढली आहे.
मेगास्टार #शाहरुखखान साठी केप टाउन मध्ये दिसले #राजा शूट
क्लासिक पोर्श 911 मध्ये रोलिंग (60-70 च्या दशकाच्या उत्तरार्धात) परंतु हे केवळ विंटेज नाही, मागील बाजूने उगवलेल्या तोफा पूर्णपणे तीव्र दिसतात.
हे स्वतःच एक पौराणिक ₹1500 CR ऑल-टाइम ब्लॉकबस्टर लोडिंग आहे. 🔥 pic.twitter.com/plfkUfS2wO
— राजवीर (@wwsrkx) 4 मे 2026
Comments are closed.