दीपक साळुंके पाटील पांढऱ्या पायाचे, जिथं जातील तिथं पराभव होतो, शहाजीबापू पाटलांचा टोला

शहाजीबापू पाटील : सांगोला नगरपालिका (Sangola Nagarpalika) जिंकल्यानंतर झालेल्या विजयी सभेत शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी तुफानी टोलेबाजी करत विरोधकांचा समाचार घेतला. धनुष्यबाणाचे बटन दाबलेले सर्व नक्की स्वर्गात जाणार. देव तुम्हाला नरकात जाऊच देत नसतो. मात्र, ज्यांनी विरोधी बटन दाबली त्यांचं काय खरं नाही त्यांच्यात रामच उरला नाही, अशा शब्दात शहाजीबापूंनी तुफानी टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी दीपक साळुंके पाटलांसह भाजपला टोला लगावला.

दीपक साळुंके पाटील पांढऱ्या पायाचे, जिथे जातील तिथं त्यांच्या पराभव असतो

यावेळी बोलताना त्यांच्या विरोधात काम केलेले माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख आणि भाजपवर देखील मुश्किल टिका करीत खिल्ली उडवली. दीपक साळुंखे स्वतःला किंग मेकर म्हणतात मी जिथे जाईल त्याचा गुलाल असतो असे सांगतात. मात्र ते ज्या ज्या गाडीत बसले त्यामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख असतील विजयसिंह मोहिते पाटील असतील, संजय मामा शिंदे असतील किंवा रणजीत निंबाळकर असतील ते असे पांढऱ्या पायाचे आहेत किती जिथे जातील त्यांचा पराभव नक्की असतो असा टोला शहाजीबापू पाटील यांनी दीपक साळुंखे यांना लगावला. आता बाबासाहेबांना सांगायला गाडीत बसू नका असे म्हणत शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांनाही टोला शहाजीबापू पाटील यांनी टोला लगावला.

आपण आजही महायुतीत असून आपल्याला महायुतीचेच काम करायचंय

मी भाकरीत साप पाळला होता म्हणूनच मला विधानसभेला पराभवाचा फटका बसला असे सांगत दीपक साळुंखेंवर शहाजीबापू पाटील यांनी टोलेबाजी केली. आपण आजही महायुतीत असून आपल्याला महायुतीचेच काम करायचे आहे. मात्र हा मतदारसंघ 2014 पासून शिवसेनेचा आहे. तुम्ही आमचा सन्मान ठेवा आम्ही तुमचा कोणताही शब्द खाली पडू देणार नाही असा इशारा शहाजीबापू पाटील यांनी भाजपाला दिला. जर तुम्ही तसे न केल्यास आम्ही पुन्हा एकट्या वाटेने जाऊ असा दमही दिला. जर तुम्ही याही वेळेला ऐकले असते तर तुम्ही सत्तेत निम्मे भागीदार झाला असता असा टोला शहाजीबापू पाटील यांनी भाजपला लगावला. भाजपचे कमळ हे आमच्या उमेदवाराच्या हातात देखील शोभले असते असेही ते म्हणाले. आज जवळपास बापूंनी दीड तास केलेल्या भाषणात अनेकांवर तुफानी टोलेबाजी केली.

महत्वाच्या बातम्या:

मला तोंड उघडायला लावू नका, एकनाथ शिंदेंना खासगीत काय बोलता हे सांगू का? बाबासाहेब देशमुखांचा शहाजीबापूंना इशारा

आणखी वाचा

Comments are closed.