Shahajibapur Patil’s statement about Uddhav Thackeray and Eknath Shinde is in discussion


मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत बोलून दाखवत असतात. अशातच शिवसेनेचे (शिंदे) नेते व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

सांगोला : विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. मात्र मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यामुळे वारंवार मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत बोलून दाखवत असतात. अशातच शिवसेनेचे (शिंदे) नेते व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. (Shahajibapur Patil’s statement about Uddhav Thackeray and मराठी is in discussion)

सांगोल्यातील एका कार्यक्रमात बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. कारण 1995 ला मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होतो. त्यानंतर मी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलो. तेव्हा उद्धव ठाकरे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी उठाव केला आणि एकनाथ शिंदे अडीच वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते, अशी आठवण शहाजीबापू पाटील यांनी बोलून दाखवली. त्यांनी असेही म्हटले की, माझी रास शिवसेनेची आहे, परंतु तरीदेखील मी काँग्रेसकडे कसा काय गेलो, हे मला माहिती नाही. पण मी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा घेऊन उतरलो आणि जिंकलो, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  Sanjay Raut : महाराष्ट्र दिनी आरपार झोंबलेला प्रश्न; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

शहाजीबापू यांनी स्वत:च्या कानशिलात लगावून घेतल्या

दरम्यान, महिनाभरापूर्वी जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार सांगोल्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना शहाजीबापू म्हणाले होते की, आरडा-ओरड करून प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी सत्ता लागते, हे यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या महान माणसाने सांगितले आहे. आता जयकुमार गोरे यांचा सत्कार घेतला. यानंतर आता उद्या वाकडे चालायचे नाही. जयकुमार गोरे सांगतील त्याच ठिकाणी आणि त्याच चिन्हाला मते द्यायची. तुम्हाला आईची शपथ आहे, असे त्यांनी उपस्थित नागरिकांना म्हटले होते. शहाजीबापू पाटील असेही म्हणाले की, ज्यांनी पाणी अडवले होते, त्यांना तुम्ही खासदार केले आणि जो पाणी देणार होता, तो घरात बसून आहे. त्यामुळे हाणून-हाणून घ्यावेसे वाटते, अशी खंत व्यक्त करत शहाजीबापू पाटील यांनी स्वत:च्या दोन कानशिलात लगावली होती.

हेही वाचा – Devendra Fadnavis : सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा निकाल समोर; कोण पास-नापास? वाचा सविस्तर



Source link

Comments are closed.