रेशनिंगच्या काळाबाजाराचा अड्डा उद्ध्वस्त, शहापुरात आणखीन 695 क्विंटल तांदूळ सापडला

संशयितरीत्या साठा जप्त केला होता. या कारवाईनंतर अॅक्शन मोडवर आलेल्या तहसीलदार व पुरवठा विभागाने शहरात झाडाझडती घेत एका गोडावूनला सील ठोकले आहे. या गोदामात आणखीन ६९५ क्विंटल रेशनिंगचा तांदूळ सापडला असून गोदाममालक रमेश अग्रवालविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेशनिंगच्या काळाबाजाराचा हा अड्डा उद्ध्वस्त झाल्याने गोरगरीबांच्या धान्याची हेराफेरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

गोरगरीबांच्या तोंडचा घास हिरावून रेशनिंगवरील धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचा डाव शहापूर पोलिसांनी उधळून लावला. यावेळी पोलिसांनी एका खासगी गोदामासमोर उभ्या असलेल्या ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यांना तब्बल १६५ क्विंटल गहू आणि तांदळाचा साठा सापडला होता. या काळाबाजाराची माहिती मिळताच पुरवठा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक व धान्य जप्त करून ट्रकचालक एजाज शहा याला बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असतानाच शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी अमृता सूर्यवंशी यांनी राईसमील व खासगी गोदामांना सील ठोकले.

Comments are closed.