बापानं कर्ज घेऊन क्रिकेट शिकवलं, पोरानं कष्टाचं चीज केलं! शहापूरच्या ओंकार तरमाळेला हैदराबदनं इतक्या लाखांत केलं खरेदी

16 डिसेंबर 2026 रोजी झालेल्या आयपीएल मिनी ऑक्शनमध्ये अनेक युवा खेळाडूंच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. याच ऑक्शनमध्ये महाराष्ट्राच्या शहापूर तालुक्यातील शेरे गावाचा युवा खेळाडू ओंकार तारमळे ही चमकती नवीन आशा ठरला. आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादने (SRH) त्याला 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत ओंकारचे वडील तुकाराम तारमळे खुर्ची सोडून उड्या मारताना, देवाचे आभार मानताना दिसत आहे. हे क्षण फक्त क्रिकेटची निवड नाहीत, तर वर्षानुवर्षे केलेल्या संघर्षाची खरी जिंकणारी वेळ होती.

तुकाराम म्हणाले, “आमची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की, मी माझ्या मुलाच्या स्वप्नांना पंख देऊ शकेन. दिल्ली आणि त्रिपुरात खेळण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून 3 लाखांचे कर्ज घेतलं. आज त्याची मेहनत रंगाला आली आणि देवाने त्याला त्याचे फळ दिले.”

ऑक्शन सुरू असताना, जेव्हा अनेक दिग्गज खेळाडूंसाठी मोठ्या बोली सुरु होत्या, ओंकार टीव्ही समोर नव्हता. तो मंदिरात बसून प्रार्थना करत होता. त्याने सांगितले, “मी फक्त शांत बसून प्रार्थना करत होतो.” जेव्हा SRH ने त्यात रस दाखवला, तेव्हा त्याने ठरवले की, “मी करून दाखवेल.”

ओंकारच्या यशामुळे शेरेसारख्या ग्रामीण भागातील लोक ढोल-नगाड्यांसह आनंद साजरा करत आहेत. आता ओंकार ऑरेंज आर्मीच्या जर्सीमध्ये मैदानावर उतरून शहापूरचा आवाज संपूर्ण जगभर पोहोचवण्यासाठी सज्ज आहे.

Comments are closed.