शाहीन आफ्रिदीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लाजिरवाणी घटना! पंचांनी फटकारत का सोडायला लावलं मैदान?
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची (Shaheen Afridi) ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग (BBL) मध्ये एका सामन्यादरम्यान एक विशेष घटना घडली.
बिग बॅश लीगचा दुसरा सामना मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात खेळला गेला. ब्रिस्बेन हीट संघाकडून शाहीन आफ्रिदी गोलंदाजी करत होता. नियमानुसार, गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये दोन ‘बीमर’ (कंबरेच्या वर जाणारे नो-बॉल) टाकल्यास, पंच त्याला तो ओव्हर पूर्ण करण्यापासून थांबवू शकतात. शाहीन आफ्रिदीने त्याच्या तिसऱ्या ओव्हरमधील तिसरा आणि पाचवा चेंडू ‘बीमर’ टाकला.
यामुळे, पंचांनी नियमानुसार त्याला गोलंदाजी करण्यापासून थांबवले आणि त्याला तो ओव्हर पूर्ण करता आला नाही.
शाहीन आफ्रिदी या सामन्यात प्रभावी गोलंदाजी करू शकला नाही. त्याने 2.4 ओव्हरमध्ये जास्त धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्याचा इकॉनॉमी रेट (धावा देण्याचा दर) 16.12 इतका जास्त होता.
प्रथम फलंदाजी करताना मेलबर्न रेनेगेड्स संघाने 20 षटकांमध्ये 5 बाद 212 धावा केल्या. टिम सीफर्टने 102 आणि ओलिविर पीकने 57 धावांचे योगदान दिले. 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हीटचा संघ 20 षटकांमध्ये 8 बाद 198 धावाच करू शकला. अखेरीस, मेलबर्न रेनेगेड्सने हा सामना 14 धावांनी जिंकला.
Comments are closed.