PSL 2026: शाहीन शाह आफ्रिदीला 10 लाखाचा दंड! जाणून घ्या संपूर्ण 'हॉटेल कांड'
पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ मध्ये एकापाठोपाठ एक नवे प्रकरण समोर येत आहे. लाहोर कंलदर्सचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीला आता एक मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामागचे कारण असे की, आफ्रिदीने पीएसएलच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्याकडून लाहोरने १० लाख पाकिस्तानी रुपयांना दंड आकरला आहे. त्याने त्याचा सहकारी सिंकदर रजा याला पाठिंबा दर्शवत त्याच्या मित्रांना हॉटेलमध्ये बोलावले होते.
‘शिस्त राखण्याच्या आणि जबाबदारीने वागण्याच्या उद्देशाचे पालन करण्यासाठी फ्रॅंचायजीने शाहीन शाह आफ्रिदीवर त्याच्या सहभागाबद्दल १० लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड आकारून एक उत्तम पाऊल उचलले आहे. लाहोर कलंदर्सने या प्रकरणामध्ये आपल्या निरीक्षणांसह एक रिपोर्ट पाकिस्तान क्रिकेट बोर्डला पाठवले आहे’, असे लाहोरने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
आफ्रिदी आणि झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू रजा यांच्यावर हॉटेलमधील संघाच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप झाल्याने हे समोर आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिदी आणि रझा हे संघाच्या ठरलेल्या हॉटेलमधील आठव्या मजल्यावरच्या रजाच्या खोलीत पहाटे १.२५ वाजेपर्यंत होते आणि त्यांच्यासोबत इतर चार अनोळखी लोक होते. त्यांना नकार देऊनही त्या दोन्ही क्रिकेटपटूंनी त्या पाहुण्यांना खोलीत ठेवले होते. पीसीबीने रझाच्या त्या चार नातेवाईकांना सुरक्षा नियमांमुळे खोलीत भेटण्याची परवानगी नाकारली होती, तरीही आफ्रिदीने त्याला दर्शवलेल्या पाठिंब्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.
फ्रॅंचायजीने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात रजाचा उल्लेख केला नाही. नकार देऊनही रजा आणि आफ्रीदी यांनी त्या चार लोकांना त्यांच्या खोलीत रात्री ११.०५ ला नेले होते. यावेळी लाहोरचे डीआयजी मुहम्मद फैजल यांनी पीएसएलचे सीईओ यांना सुरक्षा व्यवस्थेचे गंभीर उल्लंघन झाल्याची सुचना दिली.
Comments are closed.