“सगळ्यांना टीममधून बाहेर काढा”, शाहिद आफ्रिदी चिढला; जावयालाही सोडले नाही

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू चांगलेच चिडलेले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने तर त्याच्या जावयाला नाही सोडले.बाबर, शाहीन आणि शादाबला बाकी सामन्यांसाठी बाकावर बसवा, असे मत शाहिदने व्यक्त केले आहे. पुन्हा-पुन्हा तोच निकाल लागत असल्याने आता नव्या खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे, असेही विधान त्याने केले आहे.

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताने रविवारी (१५ फेब्रुवारी) पाकिस्तानला ६१ धावांनी पराभूत केले. यामुळे संघातील अनुभवी खेळाडू बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांच्यावर आजी-माजी पाकिस्तानी खेळाडूंनी चांगलाच शब्दांचा मारा केला आहे.

शाहिदने एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात बोलत होता. तो म्हणाला, “जर निर्णय घेणे माझ्या हातात असते, तर मी पुन्हा टी20 संघात बाबर, शादाब आणि शाहीन यांना निवडले नसते. त्यांना पाकिस्तानसाठी चांगली कामगिरी करण्याच्या अनेक संधी मिळाल्या आहेत, पण काल ​​ते पुन्हा अपयशी ठरले. नवख्या खेळाडूंना संधी देणे आवश्यक आहे.”

भारताविरुद्ध बाबरची कामगिरी काही खास नाही. कालच्या सामन्यातही तो ७ चेंडूत ५ धावा करत बाद झाला. भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सात खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यामध्ये शाहीनची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली. त्याने २ षटकात ३१ धावा देत केवळ एक विकेट घेतली. शादाबनेही एका षटकात १७ धावा दिल्या. त्याने फलंदाजीतही निराशा केली. तो १५ चेंडूत १४ धावा करत बाद झाला.

Comments are closed.