बांगलादेशला वगळताच शाहिद आफ्रिदीला लागली मिरची, भारताचं नाव घेत ICC वर साधला निशाणा, नको नको ते
ICC T20 विश्वचषक 2026 वर शाहिद आफ्रिदी : बांगलादेशने 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (ICC) टीकेची झोड उठली असून, या निर्णयावर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी चांगलाच संतापलेला दिसतोय. भारताचं नाव घेत आफ्रिदीने आयसीसीवर दुजाभावाचा आरोप केला आहे.
‘आयसीसीची दुहेरी भूमिका…’, आफ्रिदीचा आरोप
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) वर प्रतिक्रिया देताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, आयसीसी सर्व सदस्य देशांशी समान वागणूक देत नाही. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी आयसीसीने भारताच्या सुरक्षेच्या चिंतेला मान्यता देत सामने दुबईत घेण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी, भारत अंतिम फेरीत पोहोचला आणि पाकिस्तानला आपल्या देशात फायनलचे यजमानपदही गमवावे लागले होते.
बांगलादेशबाबत मात्र वेगळी भूमिका?
आफ्रिदीने प्रश्न उपस्थित केला की, जेव्हा भारताच्या सुरक्षेच्या चिंतेला मान्यता दिली गेली, तेव्हा बांगलादेशच्या बाबतीत आयसीसी तोच निकष का लावत नाही?, तो म्हणाला, “मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला माजी क्रिकेटपटू म्हणून सांगतो की आयसीसीची ही भूमिका अत्यंत निराशाजनक आहे. भारतासाठी जे मापदंड लावले गेले, तेच बांग्लादेशसाठी का नाही?”
‘समानतेशिवाय क्रिकेटचा कारभार शक्य नाही…’
आयीसीसीने निष्पक्ष आणि सातत्यपूर्ण भूमिका घ्यावी, अशी मागणी करत आफ्रिदी म्हणाला की,
“समानता आणि सातत्य हे जागतिक क्रिकेट प्रशासनाचे मूलभूत तत्व आहे. बांगलादेशच्या खेळाडूंना आणि त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना सन्मान मिळायला हवा. आयसीसीने पूल बांधायला हवेत, भिंती जाळायला नव्हेत.”
वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडची एन्ट्री
दरम्यान, आयीसीआयने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशऐवजी स्कॉटलंड संघाला संधी दिली जाणार आहे. हा निर्णय “कठीण पण अपरिहार्य” असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले. स्पर्धेला अवघे काही आठवडे शिल्लक असल्यामुळे सामने श्रीलंकेत हलवणे शक्य नव्हते, असे आयीसीआयचे म्हणणे आहे.
बीसीबीचा सुरक्षेचा मुद्दा
मुस्तफिजुर रहमान आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत भारतात संघ पाठवण्यास नकार दिला होता. मात्र, आयसीसीने आपल्या आढाव्यात भारतात बांग्लादेशी खेळाडू, अधिकारी किंवा चाहत्यांसाठी कोणताही ठोस धोका नसल्याचे स्पष्ट केले आणि वेळापत्रकात बदल करण्यास नकार दिला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.