देशातील लोकांना स्वत:च मारतात, नंतर ते जिवंत आहेत म्हणून व्हिडीओ दाखवतात; शाहिद आफ्रदीने पुन्हा

Shahid Afridi On Pahalgam Terror Attack : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आफ्रिदीने आधी भारताकडे पाकिस्तानने हल्ला केल्याचे पुरावे मागितले. आता त्याने असे विधान केले आहे की ज्यामुळे 140 कोटी भारतीय संतापले आहे.

भारत स्वतःच आपल्या लोकांना मारतो आणि नंतर पाकिस्तानला दोष देतो, असे विधान माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने केले आहे. आफ्रिदी इथेच थांबला नाही आणि त्याने भारतीय सैन्याचीही खिल्ली उडवली. भारतात शोककळा पसरली असताना त्यांचे हे वक्तव्य आलेसमोर आले. पहलगाममध्ये चार दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यांनी गोळीबार करण्यापूर्वी पर्यटकांचा धर्म विचारला. त्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटूने आगीत तेल ओतले आहे.

शाहिद आफ्रदीने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदीने भारतावर मोठा आरोप केला आणि म्हटले की, “दहशतवादी एक तास तिथे होते. आणि तुमच्याकडे 8 लाख सैन्य आहे पण तोपर्यंत कोणीही आले नाही आणि जेव्हा ते आले तेव्हा 10 मिनिटांत त्यांनी पाकिस्तानला आरोपी ठरवले. ते स्वतःच लोकांना मारतात आणि नंतर ते स्वतःच त्यांचे व्हिडिओ दाखवतात आणि म्हणतात की, ते जिवंत आहेत.”

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू पुढे म्हणाले की, कोणताही धर्म दहशतवाद स्वीकारत नाही. आणि पाकिस्तान नेहमीच शांतीचा संदेश देतो. आम्ही नेहमीच भारताशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न केला आहे.

शाहिद आफ्रिदी पुढे म्हणाला की, तुमचा कबड्डी संघ पाकिस्तानात खेळायला येतो, पण क्रिकेट संघ येत नाही. जर तुम्हाला ते बंद करायचे असेल तर सर्वकाही बंद करा आणि जर तुम्हाला ते चालवायचे असेल तर ते पूर्णपणे चालू द्या.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू

22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 22 पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली होती. भ्याड दहशतवाद्यांनी आधी त्यांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले, नंतर हिंदूंची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये खूप तणाव आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दहशतवाद्यांचा नायनाट करण्याची शपथ घेतली आहे. ते म्हणाले की, पहलगामवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना निश्चितच शिक्षा होईल.

हे ही वाचा –

Video : केएल राहुल आणि विराट कोहलीमध्ये मैदानात भिडले, कशावरून पेटला हा वाद? स्टार खेळाडूने सांगितले कारण

अधिक पाहा..

Comments are closed.