अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
शाहिद आफ्रिदीची अफगाणिस्तानवर टीका पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सीमेवरील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही दिसून आला. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा (3 Cricketers Die In PAK Airstrike) मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेतून (Tri-Series) माघार घेण्याचा निर्णय घेतला. या घटनेने संपूर्ण क्रीडा जगतात खळबळ उडाली. दरम्यान, माजी पाकिस्तान कर्णधार शाहिद आफ्रिदीने अफगाणिस्तानवर गंभीर आरोप केले. त्याने म्हटले आहे की, पाकिस्तानने केलेले उपकारअफगाणिस्तान विसरला आहे.
शोक निवेदन
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड पक्तिका प्रांतातील उरगुन जिल्ह्यातील शूर क्रिकेटपटूंच्या दुःखद हौतात्म्याबद्दल तीव्र दु:ख आणि शोक व्यक्त करतो, ज्यांना आज संध्याकाळी पाकिस्तानी राजवटीने केलेल्या भ्याड हल्ल्यात लक्ष्य केले गेले.
मध्ये… pic.twitter.com/YkenImtuVR
— अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (@ACBofficials) 17 ऑक्टोबर 2025
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या या दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष सुरु आहे. शुक्रवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात 48 तासांची शस्त्रसंधी झाली होती. मात्र, शांततेच्या काळात पाकिस्ताने अफगाणिस्तानमधील पक्तिका प्रांतामध्ये हवाई हल्ला केला. पाकिस्तानी हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. जिथे अफगाण क्रिकेटपटू कबीर, सिबगतुल्लाह आणि हारूनसह आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची जगभरात निंदा झाली, आयसीसीनेही मृत क्रिकेटपटूंबाबत शोक व्यक्त केला आहे.
शाहिद आफ्रिदी नक्की काय म्हणाला?
पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना आफ्रिदी म्हणाला की, “मला कधी वाटले नव्हते की असे काही घडेल. गेल्या 50-60 वर्षांपासून आम्ही त्यांची काळजी घेत आहोत. मी स्वतः कराचीमध्ये 350 अफगाण कुटुंबांची जबाबदारी घेतली आहे. दोन्ही देश शेजारी आणि मुस्लिम राष्ट्रे असल्यामुळे सहकार्याची भावना ठेवली पाहिजे, हेच आमचे नेहमीचे मत राहिले आहे.”
“हे दुर्दैवी आहे की थेट बसून चर्चा करण्याऐवजी तुम्ही अशा लोकांशी हातमिळवणी केली, जे पाकिस्तानमध्ये बराच काळ दहशतवादात गुंतले आहेत. आम्ही नेहमीच तुमचे स्वागत केले, तुम्हाला आश्रय आणि काम-व्यवसायाची संधी दिली. पण आता तुम्ही त्याच लोकांशी हातमिळवणी करत आहात, जे आमच्या देशात दहशत माजवत आहेत,” असेही आफ्रिदीने स्पष्ट केले.
दरम्यान, अफगाणिस्तानने माघार घेतल्यानंतर झिम्बाब्वे या तिरंगा मालिकेत सहभागी होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 18 ऑक्टोबर रोजी याबाबत घोषणा केली. नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात ही मालिका 17 ते 29 नोव्हेंबरदरम्यान खेळली जाणार होती.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.