वानखेडे स्टेडियममध्ये शाहरुख खानला 5 वर्षांची बंदी, नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या एका क्लिकवर

आयपीएल स्पर्धेच्या 18 व्या हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. दोन महिन्यांपर्यंत चालणारी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग 22 मार्चपासून सुरु होत आहे. संघांवर बंदी घालण्यापासून तसेच मैदानात खेळाडूंचे एकमेकांशी वाद आयपीयल इतिहासात आत्तापर्यंत अशा काही घटना घडलेल्या आहेत. यामध्ये एक वाद केकेआर संघाचा मालक शाहरुख खान याचा सुद्धा झालेला आहे. जेव्हा तो वानखेडे स्टेडियममध्ये एका सुरक्षाकर्मी भांडला होता. यामुळे त्याच्यावर स्टेडियममध्ये न येण्यासाठी 5 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

शाहरुख खान मुंबई मध्ये राहतो. तसेच क्रिकेट स्टेडियम वानखेडे जेव्हा नाव घेतलं जातं, तेव्हा आयपीएलमध्ये झालेल्या या स्टेडियम मधील वादही लक्षात येतो. 2012 मध्ये किंग खान याच सुरक्षा गार्ड सोबत भांडण झालं होतं. ज्यामुळे त्याला स्टेडियम मध्ये न येण्यासाठी 5 वर्ष बंदी घातली होती.

आयपीएल 2012 मध्ये एका सामन्यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले होते. हा सामना वानखेडे स्टेडियम मध्ये खेळला गेला होता. सामन्यानंतर एका सुरक्षा गार्डला रागाने इशारा करताना शाहरुखला पाहण्यात आले होते, जे कॅमेरा मध्ये कैद झाले.

एमसीए अधिकाऱ्यांनी केकेआर संघाचा मालक म्हणजेच शाहरुख खानला खेळानंतर खेळाच्या मैदानात चालण्याचा प्रयत्न केल्यामुळे आरोप केले होते. तसेच अधिकाऱ्यांनी त्याच्या विरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली होती. त्यांचा आरोप होता की शाहरुख खान नशेत होता आणि त्याने अधिकाऱ्यांसोबत चुकीचे वर्तन केले होते. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंध लावण्यात आला होता.

त्यावेळी एमसीए अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी बंदीची घोषणा करत म्हटले होते की, कोणीही असो नियमांचे पालन न केल्यास कारवाई होणारच मग कितीही मोठा स्टार असला तरीही. ते म्हणाले होते की योग्य परवानगीशिवाय ते मैदानाच्या आत मध्ये कसे जाऊ शकतात? तसेच प्रेझेंटेशन कार्यक्रमाशिवाय आमंत्रित केले नसल्यास कोणीही मैदानात जाऊ शकत नाही.

वानखेडे स्टेडियममध्ये 3 वर्षांच्या बंदीवर 3 वर्षांची बंदी करण्यात आली. शाहरुख खानने आपकी अदालत शोमध्ये सांगितले होते की, त्याला सुरक्षा गार्ड कडून बोललेल्या एका शब्दाचा राग आला होता.

तो म्हणाला,माझी मुले तिथे होती आणि मला वाटले की त्यांचा कोणता नियम आहे. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की माझी मुले इथे आहेत आणि मी त्यांना घेऊन जात आहे. त्यादरम्यान त्यांच्यामधील एकाने असा शब्द उच्चारला ,दिल्लीकडून असल्यामुळे मला तो शब्द शिवी वाटला. मराठीमध्ये सुद्धा तो शब्द चांगला नव्हता. थोडा धार्मिक आणि चुकीचा होता, त्यामुळे माझं स्वतःवरील संतुलन बिघडलं आणि मला राग आला त्यामुळे मी त्याला मारायला लागलो.

Comments are closed.