शाहरुख अलिबागला वाढदिवस साजरा करणार

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आपला 60 वा वाढदिवस 2 नोव्हेंबरला साजरा करणार आहे. वांद्रेतील मन्नत बंगल्याचे काम सुरू असल्याने यंदा शाहरुख मन्नत या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार नाही, तर तो अलिबाग येथील घरी वाढदिवस साजरा करणार आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. शाहरुख खान 60 वा वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत आणि जवळच्या मित्रांसोबत अलिबागला साजरा करणार आहे. 1 नोव्हेंबरला सर्व जण अलिगाबला पोहोचतील, असेही बोलले जात आहे.

शाहरुखच्या बर्थ डे पार्टीत सलमान खान, आमीर खान यांच्यासह कोण-कोण दिसणार हे लवकरच कळेल. शाहरुख दरवर्षी आपला वाढदिवस मन्नत या बंगल्यात साजरा करतो. वाढदिवशी शाहरुखचे हजारो चाहते बंगल्याबाहेर गर्दी करतात, परंतु मन्नत बंगल्याचे बांधकाम सुरू असल्याने यंदा शाहरुख मन्नतबाहेर वाढदिवस साजरा करणार आहे.

शाहरुख सध्या ‘किंग’ या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरुखची मुलगी सुहाना खान दिसणार आहे. यामुळे या चित्रपटाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. शाहरुखचा ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. आता त्याच्या चाहत्यांना ‘किंग’ या चित्रपटाची उत्सुकता आहे.

31 ऑक्टोबरपासून एसआरके फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला असून हा फेस्टिव्हल 2 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. पीव्हीआर आयनॉक्स सोबत मिळून हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. यात शाहरुख खानचे चित्रपट दाखवले जाणार आहेत.

Comments are closed.