पाकिस्तान-बांग्लादेशचं वर्चस्व संपलं? आता आशियातील भारतानंतर सर्वश्रेष्ठ टीम कोणती ??
एक वेळ होती जेव्हा आशियाई संघांच क्रिकेटमध्ये वर्चस्व होतं. भारत, पाकिस्तान, श्रीलंका हे संघ विश्वातील टॉप संघांमध्ये होते. तसेच कधी कधी बांगलादेश उलटफेर करत असे. भारतीय संघाने त्यांचे वर्चस्व कायम राखले आहे पण आता पाकिस्तान बांगलादेश सहित काही अन्य संघ पिछाडीवर पडले आहेत यादरम्यान एक नवीन आशियाई संघ पुढे आला आहे ज्या संघाचं नाव अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तान मागच्या तीन चार आयसीसी स्पर्धे मध्ये भारतीय संघानंतर आशियाई दुसरा टॉप संघ बनण्यामध्ये यशस्वी ठरली आहे.
2019 मधील एकदिवसीय वर्ल्डकप मध्ये जेव्हा अफगाणिस्तान त्यांचे सर्व 9 सामने पराभूत झाला होता. त्यानंतर अफगाणिस्तान संघाने 2021 टी20 वर्ल्ड कप मध्ये सुधारणा केली पण स्पर्धेत पुढे टिकू शकला नाही पण त्यांनी खेळामध्ये खूप लय राखली होती. अफगाणिस्तान संघात खूप सुधारणा झाली आहे आणि संघ आता मोठ्या मोठ्या संघांविरोधात बाजी मारताना दिसत आहे.
जर आयसीसी स्पर्धेमधील 2023 वर्ल्डकप आणि 2024 टी 20 वर्ल्डकप बद्दल बोलायचे झाल्यास अफगाणिस्तानने इंग्लंड,पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघावर मात केली आहे. 2023 च्या वर्ल्डकप मधील पॉईंट्स टेबलवर इंग्लंड आणि श्रीलंका संघाच्या वर सहाव्या स्थानी राहून अफगाणिस्तानने डायरेक्ट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी क्वालिफाय केले होते. दुसरीकडे याच अफगाणिस्तान संघाने 2024 टी20 वर्ल्ड कप मधील सेमी फायनल पर्यंत भिडंत केली होती.
2024 टी20 वर्ल्डकप पाहायचं म्हटलं तर पाकिस्तान संघाची अवस्था एवढी वाईट होती की संघ सर्वोत्तम 8 पर्यंत देखील पोहोचू शकला नव्हता. तर अफगाणिस्तान सर्व बाकीच्या संघांना मागे टाकून सेमी फायनल फेरीपर्यंत पोहोचला होता आता अफगाणिस्तान संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत देखील इंग्लंड संघाला हरवून स्वतःच्या संघाला आशियाई सर्वोत्तम संघ म्हणून सिद्ध केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारतासाठी अफगाणिस्तान दुसरा आशियाई संघ राहिला आहे.
हेही वाचा
PCB मोठ्या निर्णयाच्या तयारीत, पाकिस्तान संघाच्या संपूर्ण कोचिंग स्टाफवर गंडांतर!
शुबमन गिलबद्दल मोठा खुलासा, भारतीय संघासाठी खुशखबर
चॅम्पियन्स ट्रॉफीतील टीम इंडियाचा सर्वोत्तम खेळाडू – विराट नाही, हा स्टार गाजवतोय मैदान!
Comments are closed.