Shakti Dubey ranks first, Harshita Goyal ranks second and Archit Dongre ranks third in UPSC CSE exam results
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा (CSE) 2024चा निकाल आज (22 एप्रिल) जाहीर झाला आहे. या निकालसोबतच आता टॉपर्सची यादी देखील समोर येत आहे. महाराष्ट्रातून पहिला क्रमांका पटकावलेला अर्चित डोंगरे हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अर्चित डोंगरेच्या यशामुळे महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे.
पुणे : यूपीएससी नागरी सेवा परीक्षा (CSE) 2024चा निकाल आज (22 एप्रिल) जाहीर झाला आहे. या निकालसोबतच आता टॉपर्सची यादी देखील समोर येत आहे. शक्ती दुबेने यूपीएससी परीक्षेत पहिला क्रमांका पटकावला आहे, तर मुलींमध्ये हर्षिता गोयल हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. टॉपर्सच्या यादीत हर्षिता गोयल ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातून पहिला क्रमांका पटकावलेला अर्चित डोंगरे हा देशात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अर्चित डोंगरेच्या यशामुळे महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे. (Shakti Dubey ranks first, Harshita Goyal ranks second and Archit Dongre ranks third in UPSC CSE exam results)
यूपीएससी परीक्षा (UPSC) देऊन प्रशासकीय सेवेत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी तरुण-तरुणी दिवसरात्र एक करून अभ्यास करत असतात. अशी मेहनत घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आज निकालानंतर त्याचे फळ मिळाले आहे. सप्टेंबर महिन्यात यूपीएससी परीक्षा (UPSC Exam 2025) आणि जानेवारी महिन्यात पर्सनॅलिटी टेस्ट झाली होती. त्यानंतर एकूण 1009 उमेदवारांपैकी 241 उमेदवारांची निवड करण्यात आली होती. आता युपीएससी सीएसई निकाल जाहीर झाल्यानंतर शक्ती दुबे याने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर हर्शिता गोयल ही देशातून दुसरी आली आहे. तसेच महाराष्ट्राच्या पुण्यातून अर्चिंत डोंगरे हा देशातून तिसरा आला आहे. शाह मार्गी चिराग याने चौथा क्रमांक आणि आकाश गर्ग याने पाचवा क्रमांक पटकावला आहे.
हेही वाचा – Rajkot Shivaji Maharaj Statue : ‘चांगल्या’ हातांनी अनावरण व्हावे, रोहिणी खडसेंचा भाजपाला टोला
यशस्वी उमेदवारांना आता त्यांच्या पसंती, रँक आणि उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या सेवा आणि केडर देण्यात येणार आहे. हे वाटप भारत सरकारच्या धोरणांनुसार असेल. आता निवड झालेल्या उमेदवारांना लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन (LBSNAA)मध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल. याठिकाणी आयएएस (IAS) पदासाठी ट्रेनिंग दिले जाते. तर आयपीएस (IPS) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमीत ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल. दरम्यान, यूपीएससी सीएसई परीक्षेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या देशातील भावी आयएएसची यादी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Meet UPSC 2024 TOPPER
AIR 3 👉 𝗗𝗢𝗡𝗚𝗥𝗘 𝗔𝗥𝗖𝗛𝗜𝗧 𝗣𝗔𝗥𝗔𝗚 pic.twitter.com/YDwSslVPhw— UPSC Community (@upsccommunity) April 22, 2025
आयएएस बनणाऱ्या टॉप 10 अधिकाऱ्यांची नावे
- शक्ती दुबे
- हर्षिता गोयल
- डोंगरे अर्चित पराग
- शाह मार्गी चिराग
- आकाश गर्ग
- कोमल पुनिया
- आयुषी बंसल
- राज कृष्ण झा
- आदित्य विक्रम अग्रवाल
- मयंक त्रिपाठी
Comments are closed.