मेघदूत बंगल्यात 55 वर्षांनी पाऊल ठेवलं, शंभूराज देसाई आईसोबत हमसून हमसून रडले, ज्या बंगल्यावर ज

शंभुराज देसाई: महायुतीतील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले. यात राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या वाट्याला ‘मेघदूत बंगला’ (Meghdoot Bungalow) आला. आज 3 ऑगस्ट रोजी शंभूराज देसाई यांनी त्यांच्या कुटुंबियांसह मेघदूत बंगल्यात गृहप्रवेश केला. गृहप्रवेशाच्या क्षणी शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यांत अश्रू अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. ज्या बंगल्यात जन्म झाला त्याच बंगल्यात तब्बल 55 वर्षांनंतर शंभूराज देसाई यांनी गृहप्रवेश केल्याने देसाई कुटुंबीय भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

‘मेघदूत बंगला’ हा देसाई कुटुंबासाठी फक्त एक शासकीय निवासस्थान नाही. तर या बंगल्याशी त्यांची भावनिक नाळ जोडलेली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा स्व. बाळासाहेब देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना मेघदूत बंगला मिळाला होता. त्या काळातच शंभूराज देसाई यांचा जन्म झाला आणि त्यांनी आपले पहिले पाच वर्षांचे बालपण याच बंगल्यात घालवले होते.

55 वर्षांनंतर पुन्हा त्या आठवणी जाग्या

आज, तब्बल पाच दशके उलटून गेल्यानंतर जेव्हा शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्री या बंगल्याच्या गृहप्रवेशासाठी पोहोचल्या, तेव्हा त्या वास्तूप्रती असलेल्या भावना अनावर झाल्या. घरात पाऊल टाकताच शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींच्या डोळ्यांत पाणी आले. यावेळी संपूर्ण देसाई कुटुंब देखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

कुटुंबासाठी खास क्षण

गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात देसाई कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि काही निकटवर्तीय उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने विधी पार पडले आणि वातावरण संपूर्णपणे भावनिक झाले. ‘मेघदूत’ या बंगल्याशी संबंधित आठवणी, जुने क्षण आणि बालपणाचे अनुभव यामुळे घरातील प्रत्येकजण हा क्षण विशेष मानत होता.

काय म्हणाले शंभूराज देसाई?

यावेळी शंभूराज देसाई माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, आज नवीन शासकिय निवासस्थान मेघदूत हा बंगला मुख्यमंत्र्यांनी दिला त्यांचे आभार मानतो. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने गृहप्रवेश केला. लहानपणापासून या बंगल्याशी अनेक आठवणी आहेत. मी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती की, मेघदूत बंगला मिळावा. मी एकदाच सांगितलं, दुसर्‍यांदा सांगावं लागलं नाही. गृहप्रवेशावेळी आईला भरून आलं, लग्नानंतर याच घरात त्यांनी प्रवेश केला. आम्ही सर्वच भावूक झालो. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्रात मोठं केलं. तसंच कार्य माझा हातून घडावं, या माझ्या भावना आहेत. आई-वडील दोघांची इच्छा होती की, मी स्पर्धा परीक्षा द्यावी. आई म्हणायची तू कलेक्टर होवो. पुण्यात शिकायला असताना मला सांगितलं जायचं की देशपांडे सरांकडे जा. माझ्या वडिलांचं निधन झालं, त्यानंतर सर्व जबाबदारी माझ्यावर होती. मतदार संघातील दिग्गज नेत्यांनी आईंना विनंती करून मला राजकारणात पाठवण्यास सांगितलं, असे त्यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=zldnu78hxqi

आणखी वाचा

Asim Sarode on मराठी: सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात महाराष्ट्रातील शिंदेंची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द येत्या महिनाभरात संपवतील; सुनावणी तोंडावर असताना असीम सरोदेंचा मोठा दावा

आणखी वाचा

Comments are closed.