मी म्हणल तेच खरं असं उद्धव ठाकरे वागतात; देसाईंनी सांगितला MVA च्या मुख्यमंत्रीपदाचा किस्सा
शंभुराज देसाई: उद्धव ठाकरे हे मी म्हणल तेच खरं असं वागत आहेत. कारण आपल्यातले लोक विचलित होऊन शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊ नये यासाठी शिवसेनेच्या चिन्हाबाबत ते असे विधान करत आहेत असल्याचे मत मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर हे राज्य चालते. पक्षाच्या चिन्हाचे सर्व अधिकार हे घटनेच्या नियमानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत असे देसाई म्हणाले. जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंच्या जवळच्या लोकांनीच मुख्यमंत्री पदासाठी त्यावेळी महाविकास आघाडीची स्थापना करायला लावली, असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
ज्या सरकार बरोबर आम्ही लढलो त्यांच्यासोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले
शिवसेना पक्षाच्या चिन्हा विरोधात काही लोकांनी न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला मात्र न्यायालयाने देखील यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही. असे असताना मी म्हणल तेच खरं असं उद्धव ठाकरे म्हणत असतील तर ते योग्य नाही असे शंभूराज देसाई म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून काम केलेले उद्धव ठाकरे हे आपल्यातील काही लोक विचलित होऊन शिंदेंच्या शिवसेनेत येऊ नये म्हणून असे वक्तव्य उद्धव ठाकरे करत आहेत. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आम्हा सर्व आमदारांकडे बोट दाखवून यांच्यापैकी मला एक मुख्यमंत्री करायचा आहे असं सांगितलं होतं. त्यानंतर स्वतः आठ दिवसात मुख्यमंत्रीपद घेतलं. आता ते जरी म्हणत नसतील माझ्या स्वप्नात मुख्यमंत्री पदाचा विचार नव्हता. मग त्यांनी असं बोलायची गरज नव्हती. ज्या सरकार बरोबर आम्ही लढलो त्यांच्यासोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले हा विपर्यास आहे असे देसाई म्हणाले.
निवडणूक एका बाजूला लढवायची आणि मुख्यमंत्रीपद दुसऱ्या सरकारकडून घ्यायचे
निवडणूक एका बाजूला लढवायची आणि मुख्यमंत्रीपद दुसऱ्या सरकारकडून घ्यायचे. जाणीवपूर्वक त्यांच्या जवळच्या लोकांनीच मुख्यमंत्री पदासाठी त्यावेळी महाविकास आघाडीची स्थापना करायला लावली, असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. दरम्यान, आता शंभूराज देसाई यांच्या या टीकेवर शिवसेना ठाकरे गट काय उत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
आणखी वाचा
Comments are closed.