शमीच्या रोजाबाबत इंजमाम उल हकचं मोठं वक्तव्य! जाणून घ्या एका क्लिकवर

मागच्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची खूप चर्चा होत आहे. पण ही चर्चा वेगळ्या कारणावरून होत आहे त्याने रमजान मधील रोजा न पाळल्यामुळे त्याच्यावर टीका होत आहेत. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरी सामन्यात मोहम्मद शमी सामान्य दरम्यान ज्यूस पिताना दिसला. यानंतर त्याच्यावर खूप टीका करण्यात आल्या आहेत. यानंतर शमीने रोजा न ठेवल्यामुळे पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

बीबीसी हिंदी यांनी त्यांच्या रिपोर्ट मध्ये इंजमाम उल हक काय म्हणाले ते लिहिलं आहे. ते म्हणाले खेळताना रोजा सोडल्यावर एवढी मोठी गोष्ट नाही आहे. पण मला वाटते की, शमीने सार्वजनिक ठिकाणी ते ज्यूस पिल्याने त्याच्यावर टीका होत आहेत. खेळताना रोजा पाळणे कठीण आहे. याचा आम्हालाही अनुभव आहे. जेव्हा आम्ही रोजा चालू असताना सामने खेळायचो तेव्हा पाणी पिण्यासाठी जेव्हा ब्रेक मिळायचा तेव्हा आम्ही स्क्रीनच्या मागे जाऊन पाणी पित होतो.

ते असंही म्हणाले की, आम्हा मुस्लिम लोकांसाठी रमजानच्या महिन्याचं एक खास महत्त्व आहे. मुस्लिम लोक कोणत्याही परिस्थितीत रमजानचे रोजे ठेवतात. पण कधी – कधी या गोष्टीमध्ये सूटही दिली जाते. जसे की कोणी आजारी असेल किंवा सफर करत असेल तर ते नंतर रोजा ठेवू शकतात.

शमीवर टीका करणारे लोक हाशिम अमलाचं‌ उदाहरण देऊन त्याच्यावर टीका करत आहेत. लोकांचं म्हणणं आहे की, दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हाशिम अमलाने रोजा ठेवून 300 धावांची पारी खेळली होती. तर शमी सुद्धा रोजा ठेवू शकतो. ही गोष्टच पहिल्यांदा चुकीची आहे. हाशिमने जेव्हा 300 धावांची पारी खेळली होती तेव्हा, ती रोजा ठेवल्यामुळे खेळली नव्हती. त्याने एका इंटरव्यू मध्ये सांगितले होते . याशिवाय एका वेगवान गोलंदाजासाठी एका सामन्यादरम्यान रोजा ठेवणे खूप अवघड आहे.

हेही वाचा

इंग्लंडच्या खेळाडूने तोडला IPL नियम, 2 वर्षांची बंदी शक्य!

संघ हरणार असेल, तर माझ्या शतकांना काही अर्थ नाही! – रोहित शर्मा

अंतिम सामन्यानंतर भारतीय संघावरती प्रशिक्षकाने केला कौतुकांचा वर्षाव!

Comments are closed.