इंग्लंड दौऱ्यातून शमी बाहेर होणार? टीम इंडियाच्या निवडीवर मोठी अपडेट समोर!

इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड शनिवार 23 मे रोजी होणार आहे. टीम इंडियाच्या निवडीपूर्वी काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येत आहे की, बीसीसीआय सिलेक्शन कमिटी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (mohmmad shami) या दौऱ्यातून बाहेर करण्याचा विचार करत आहे. तसेच जसप्रीत बुमराह (jaspreet bumrah) विषयी सुद्धा एक मोठी अपडेट समोर येत आहे.

बीसीसीआयच्या मेडिकल टीमने बोर्डाला सांगितले आहे की, 34 वर्षांचा शमी आता मोठ्या काळासाठी गोलंदाजी करण्यासाठी पूर्णरित्या फिट नाही. अशा परिस्थितीत हे निश्चित नाही की, तो पूर्ण 5 कसोटी सामने खेळू शकेल की नाही. त्यामुळे असे मानले जात आहे की, चीफ सिलेक्टर अजित आगरकर भारतीय संघात वेगवान गोलंदाजांना सामील करण्याचा विचार करत आहेत.

मोहम्मद शमीला भारतीय संघात सामील करण्याच्या आणि त्याला काही सामने खेळवण्याच्या विषयावर चर्चा सुरू आहेत. जसप्रीत बुमराहने बोर्डाला आधीच सांगितले आहे की, तो तीन पेक्षा जास्त कसोटी सामने खेळू शकणार नाही. यामुळे सिलेक्शन कमिटी विचारात आहे की कोणत्या निश्चित गोलंदाजांना संघात सामील केले पाहिजे.

बोर्डाच्या एका सूत्रांकडून इंडियन एक्सप्रेसला सांगण्यात आले आहे की, शमी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी 4 षटके गोलंदाजी करत आहे. पण बोर्डातील निवडकर्त्यांना माहित नाही की, एका दिवसात 10 षटकांपेक्षा अधिक गोलंदाजी करू शकतो की नाही. इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांकडे लांब स्पेलची मागणी होऊ शकते आणि त्यामुळेच सिलेक्शन कमिटी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. शमीने त्याचा शेवटचा कसोटी सामना 2023 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन फायनल दरम्यान खेळला होता.

Comments are closed.