शमी आणि सिराजला आयसीसी रँकिंगमध्ये फायदा! शुबमन गिल अव्वल तर रोहित-विराटचाही जलवा कायम

आयसीसी रँकिंग ऑगस्ट 2025: आयसीसीने (27 ऑगस्ट) रोजी नवीन क्रमवारी (रँकिंग) जाहीर केली आहे. या क्रमवारीत अनेक खेळाडूंना फायदा झाला आहे, तर काहींना नुकसान झाले आहे. आयसीसीच्या वनडे गोलंदाजी क्रमवारीत मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांना फायदा झाला आहे. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एका स्थानाची प्रगती केली आहे. मोहम्मद शमी 13 व्या स्थानावरून 12 व्या स्थानावर आला आहे, तर मोहम्मद सिराज 14 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर पोहोचला आहे. (ICC ODI bowling rankings)

अलीकडेच सिराजने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत शानदार गोलंदाजी केली होती. त्याने संपूर्ण मालिकेत सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या होत्या. सिराज आयसीसीच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत 15 व्या स्थानावर आहे. (Mohammed Siraj ranking)

याव्यतिरिक्त, वनडे फलंदाजी क्रमवारीत शुबमन गिल (Shubman Gill) पहिल्या क्रमांकावर आहे, तर रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. त्याचप्रमाणे, विराट कोहली (Virat Kohli) चौथ्या स्थानावर कायम आहे. (India cricket player rankings 2025)

Comments are closed.