शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे, असे वृत्त ‘टीव्ही९ मराठी’ने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना सध्या पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच काही काळ प्रवास टाळण्याच्या सूचनाही त्यांना करण्यात आल्या आहेत. सध्या ते त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत, असे वृत्तात सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील X वर पोस्ट करून माहिती दिली की, “आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते आपल्या निवासस्थानी आराम करीत आहेत.”

Comments are closed.