Sharad Pawar group regional secretary Professor Shrihari Kale dies in an accident


बीड जिल्ह्यातील नाकलगाव येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्राध्यापक श्रीहरी काळे (47) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. माजलगाव शहराजवळ असलेल्या खरात आडगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कडेला उभे असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बीड : बीड जिल्ह्यातील नाकलगाव येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्राध्यापक श्रीहरी काळे (47) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. माजलगाव शहराजवळ असलेल्या खरात आडगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कडेला उभे असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Sharad Pawar group regional secretary Professor Shrihari Kale dies in an accident)

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीहरी काळे हे नातेवाईकाच्या लग्न समारंभास सकाळी दुचाकीवरून परभणीला गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. भगवान सरवदे हेही होते. सायंकाळी लग्नकार्य उरकून श्रीहरी काळे आणि डॉ. भगवान सरवदे हे दोघे दुचाकीवरून परभणीकडून माजलगावकडे राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टणम वरून येत होते. माजलगाव शहरापासून 10 किमी अंतरावर असणाऱ्या खरात आडगाव फाटा येथे ते दोघे रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान चहापाणी घेण्यासाठी थांबले.

हेही वाचा – Maharashtra : वाढीव मतदानाचं गौडबंगाल! न्यायालयाची महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला नोटीस 

डॉ. भगवान सरवदे हे दुचाकीच्या एका बाजूने उतरले. तर दुसऱ्या बाजूने श्रीहरी काळे उतरत होते. याच दरम्यान भरधाव वेगात असणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने काळे यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर डॉ. भगवान सरवदे आणि स्थानिकांनी श्रीहरी काळे यांना तत्काळ माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातानंतर चारचाकी वाहन चालक फरार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात वाहनांविरुद्ध गुन्हा दाखल करून वाहन चालकाच शोद घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र प्राध्यापक श्रीहरी काळे यांच्या अपघाती निधनाने माजलगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. कारण प्राध्यापक श्रीहरी काळे हे उत्तम वक्ते होते. माजलगाव विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.

दोन दिवसांपूर्वीच तिघांचा अपघाती मृत्यू

अंबाजोगाई-केज-मांजरसुंभा मार्गावर चंदन सावरगावजवळ 1 फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला होता. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये बीड तालुक्यातील समनापुर येथील गणपत नारायण गोरे (40), खांडे पारगाव येथील परमेश्वर नवनाथ काळे (39) आणि दिंद्रूडच्या अमित दिलीपराव कोमटवार (35) यांचा समावेश आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य केले. तर अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले.

हेही वाचा – मराठी : महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची दांडी



Source link

Comments are closed.