सरकारने वेगाने पंचनामे करून नुकसान भरपाई देणं गरजेचं; शरद पवार यांचे मत
महाराष्ट्रात अतिवृष्टीने भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या संकटावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच सरकारने वेगाने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत पुरवण्याची गरज व्यक्त केली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून बऱ्याच भागांत पाणी साठलं आहे आणि पिकं पाण्याखाली गेली आहेत. अतिवृष्टीने शेतकऱ्यांनाही मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात अभूतपूर्व पाऊस पडलाय. राज्यात अतिवृष्टी झाली, त्याचा प्रचंड परिणा शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्याच्या संसारावर झालेला आहेय दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, त्याचा प्रचंड मोठा परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. सोयाबीनच भरवश्याचं पीक आहे, मात्र पाण्यामुळे सोयाबीनची पीक कुजून गेली, त्याच्यापासूनचं जे उत्पादन होतं शेतकऱ्याच्या हातात नाही, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाले. मी दुष्काळ पाहिला मात्र अशी अतिवृष्टी मी यापूर्वी कधीही पाहिली नाही, असे शरद पवार म्हणाले.
ही अतिवृष्टी ज्या जिल्ह्यात कामी पाऊस असतो त्या जिल्ह्यात पाऊस पडतोय. सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी नगर या सगळ्या भागात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच अतोनात नुकसान झाले आहे. असं संकट जेव्हा येतं तेव्हा त्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. नैसर्गिक आपत्ति असेल तर त्याला सहाय्य करण्याची योजना केंद्र सरकारमध्ये आहे. त्या योजनेची राज्यामार्फेत अंमलबजावणी केली जाते. राज्याने अतिशय वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण गरजेचं आहे, असं शरद पवार म्हणाले.
पिकांसोबत जमीन आणि पाणंद रस्ते यांचे पंचनामे करावे लागतील. गुरं देखील वाहून गेली आहेत यांचे पंचनामे गतीने करावे लागतील. शेतकऱ्याला विश्वासात घेऊन तातडीची आणि कायमस्वरूपीची मदत शेतकऱ्यांना देण आवश्यक आहे. राज्य आणि केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्तीमध्ये साहाय्य करण्याची योजना आहे. शेतकरी राजा, पुन्हा एकदा कसा उभा करायचा याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे पीके हे भरवश्याचं पीक असते. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि बाकीच्या पिकांची वाढ झाली, पण पाच दिवस वाफ्यात पाणी राहिलं आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर पीकं कुजून केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याच्यापासून उत्पादन होतं, ते हातात पडलेले नाही. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. आपण दुष्काळ पाहिला पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नाही. ही अतिवृष्टी ज्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस असतो, तिकडे झाली आहे.
पीक वाया गेलं तर फक्त त्यावर्षी नुकसान होते. पण जमिनीवरची माती वाहून गेली तर त्यामधून उत्पादन येण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे यावेळची मदत फक्त पंचनामे करुन, पीक गेलं म्हणून चालणार नाही. पिकासाठी मदत द्यावीच लागेल. पण जमिनीसाठीही मदत करावी लागेल. त्यासोबत पाणंद रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, त्यासाठीही मदत करावी लागेल. अनेक ठिकाणी तक्रारी आहेत, गुरं वाहून गेली. या सगळ्या गोष्टीकडे राज्य सरकारने बघितले पाहिजे, हे काम सरकारने गतीने केले पाहिजे. पहिल्यांदा पंचनामे, पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे, पिकांची पाहणी करणे आणि वास्तव पंचनामे करणे, गरजेचे आहे. यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरुपाची मदत ही अभूतपूर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. आम्ही अपेक्षा करतो, राज्य सरकार अत्यंत याचा गांभीर्याने विचार करेल, असेही शरद पवार म्हणाले.
Comments are closed.