Sharad Pawar NCP SP on India Pakistan Ceasefire and America stands


मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “काश्मीरचा मुद्दा हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संवेदनशील मुद्दा आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या देशाने या विषयात हस्तक्षेप करणे योग्य आहे का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, शिमला करारानुसार काश्मीर प्रश्नावर फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातच द्विपक्षीय चर्चा होऊ शकते. यात तिसऱ्या देशाला नाक घालण्याची गरज नाही,” असे त्यांनी ठामपणे आपली भूमिका मांडली. (Sharad Pawar NCP SP on India Pakistan Ceasefire and America stands)

हेही वाचा : Bacchu Kadu : नेहमीचं दुखणं बंद करण्यासाठी पाकिस्तान भारतात घ्या; बच्चू कडूंचे वक्तव्य चर्चेत 

1972 च्या शिमला करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व वाद, खासकरून काश्मीर प्रश्न, द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवले जाणार आहेत. या करारात तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाला स्पष्टपणे नकार देण्यात आला आहे. शरद पवार यांनी या कराराचा दाखला देत तिसऱ्या देशाच्या ट्वीट किंवा हस्तक्षेपावर आक्षेप घेतला. “दोन्ही देशांचे पंतप्रधान असताना तिसऱ्या देशाची मध्यस्थी का?” असा सवाल त्यांनी केला आहे. “काश्मीर प्रश्नावर संसदेत चर्चा होणे कठीण आहे. काही मुद्दे गोपनीय ठेवण्याची गरज असते,” असेदेखील पुढे शरद पवारांनी सांगितले. पण, याबाबत सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन माहिती दिली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

विशेष अधिवेशन बोलावण्यापेक्षा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणून चर्चा करणे अधिक योग्य ठरेल, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले. यामुळे काश्मीर प्रश्नावर पारदर्शकता येईल तसेच सर्व पक्षांना सरकारच्या भूमिकेची माहिती मिळेल, असेही ते म्हणाले. “काश्मीर प्रश्न हा फक्त भारत-पाकिस्तान संबंधांचाच भाग नाही, तर तो राष्ट्रीय एकतेचा आणि सुरक्षेचा मुद्दा आहे. या विषयावर सर्व पक्षांना विश्वासात घेऊन राष्ट्रीय एकमत निर्माण केले जावे. यामुळे काश्मीर प्रश्नावर भारताची भूमिका अधिक मजबूत होईल. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दृष्टिकोन स्पष्ट होईल, ” असे ते म्हणाले.



Source link

Comments are closed.