राज्यातील सामाजित ऐक्य महत्त्वाचे, दुसरा रस्ता परवडणारा नाही; शरद पवार यांचा गंभीर इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी समस्यांकेड सरकारचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील सामाजिक ऐक्य महत्त्वाचे आहे. जातीजातीत तेढ निर्णाण होणे योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
राज्यात अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी संकटात आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला आहे. आता शेतकरी सरकारकडे आशेने बघत आहे. शेतकरी संकटात असताना देवाभाऊंनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
मुंबई- ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आहे. मुंबई ठाणे महापालिकेत अनेक वर्षे त्यांची सत्ता होती. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्यांचा आनंदच आहे. ते एकत्र आले आणि मुंबई महापालिकेत त्यांची सत्ता आली तर आनंदच आहे, असेही त्यांनी सपष्टपणे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांची ताकद पाहून निर्णय घेतला जाईल. प्रत्येक घटक पक्षांची बलस्थाने ओळकून निर्णय घेतला जाईल. काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून एक६ लढूच असे नाही. मात्र, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रच आहोत, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील सामाजिक ऐक्य महत्त्वाचे आहे. जाती-जातीत , गावा-गावात किंवा विविध समाजांमध्ये निर्माण होणारी तेढ महाराष्ट्रासाठी घातक आहे. विविध समाजाच्या नेत्यांनी प्रक्षोपक आणि दुसऱ्या समजावर टीका करणे टाळणे गरजेचे आहे. राज्यातील सामाजिक सलोखा टिकवण्याची जबाबदीर सरकारची आहे. सामान्यांमधील एकीची वाण उसवू देऊ नये. सामाजक ऐक्य महत्त्वाचे असून दुसरा रस्ता घातक आणि परवडणारा नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारने मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासह इतर समाजाच्या आरक्षणाबाबत त्या समाजाच्या भावना ओळखणे गरजेचे आहे. या समाजातील नेत्यांशी चर्चा करून सामंजस्याने आणि समोपचाराने मार्ग काढणे गरजेचे आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
मराठा आणि ओबीसी एकमेकांच्या हॉटेलमध्येही जात नाहीत, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. राजकीय स्वार्थासाठी काहीजण अयोग्य विधाने करत आहे. त्यांच्यासाठी राजकारण महत्त्वाचे आहे पण आमच्यासाठी सामाजिक सलोखा महत्त्वाचा आहे. 1994 मध्ये आपण आरक्षणाचा तिढा सोडवला नाही, असे काहीजण सांगत आहे. मात्र, 1994 साली आरक्षणाचा विषयच नव्हता, हे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. आरक्षणाबाबत राजर्षी शाहू महाराजांनी व्यापक दृष्टीकोन ठेवला होता. जातपात पाहून नाही, तर आर्थिक स्थिती आणि गरज पाहून आणि प्रत्यकाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी आरक्षण सुरू केले होते. आजच्या परिस्थितीत असा व्यापक दृष्टीकोनाने विचार होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
Comments are closed.