Sharad Pawar rejected allegation that the platform of Sahitya Sammelan was used politically
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (ता. 24 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर झाल्याच्या आरोपांना अमान्य केले आहे.
मुंबई : दिल्लीत झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अखेर वादाचे ग्रहण लागले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारणात खळबळ तर उडाली आहेच. पण त्याचसोबत ठाकरे गट देखील आक्रमक झाला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय गैरवापर झाला झाल्याचे म्हटले. त्यांच्याशिवाय सुद्धा अनेकांनी हे खरे असल्याचे म्हटले आहे. पण हे आरोप आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमान्य केले आहेत. (Sharad Pawar rejected allegation that the platform of Sahitya Sammelan was used politically)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (ता. 24 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी आरोप अमान्य करत म्हटले की, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर झाला असा आरोप होत आहे, तो आरोप मला मान्य नाही. त्याचे कारण म्हणजे आपण जर साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची पत्रिका पाहिली तर त्यामध्ये साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीत कोणीही राजकीय नव्हते. फक्त उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी (शरद पवार) आणि देवेंद्र फडणवीस होते. तसेच साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमातील पुढच्या सत्रामधील मग त्यामध्ये मराठी पाऊल पडते पुढे, मन मोकळा संवाद, कमी संमेलन, मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म, यासह आदी कार्यक्रमाची यादी आपण पाहिली तर फक्त दोन ते तीन ठिकाणीच राजकीय मंडळी दिसतात. त्यामुळे फारसे कोणी राजकारणातले नव्हते, असे यावेळी शरद पवारांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा… Sharad Pawar : नीलम गोऱ्हेंनी असे भाष्य केले नसते तर, शरद पवारांनी स्पष्टच सांगितले
तर, तिसरी मुलाखत मराठी पाऊल पुडते पुढे यात नलिनी पंडित होत्या. एकही राजकीय नव्हते. मनमोकळा संवादात ज्ञानेश्वर उबाळे होते. राजदीप सरदेसाई होते. मंजिरी वैद्य या कार्यक्रमात होते. यातही कोणी राजकीय नव्हते. त्यानंतरच्या परिसंवादातही राजकीय नव्हते. लोकसाहित्य ते भैरवी यात संवादातही राजकारणी नव्हते, असे सांगत यावेळी शरद पवारांनी कार्यक्रमाची पत्रिका वाचून दाखवली. त्यामुळे या संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर हा राजकारणासाठी झाला नसल्याचे शरद पवारांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. परंतु, आता शरद पवारांनी केलेल्या या विधानाबाबत खासदार संजय राऊत काय बोलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.