संजय राऊतांची लेखणी अनेकांना पचत नव्हती, ते फक्त संधीची वाट पाहत होते : शरद पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात तपास यंत्रणांचा राजकीय हेतूनं वापर, ईडीच्या विरोधकांवरील कारवाई यासंदर्भात भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, संजय राऊतांनी काय केलं होतं, ते नियमित सामनामध्ये रोखठोक भूमिका मांडतात, ते सुरु होतं. ती त्यांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती. ते अस्वस्थ होते, फक्त संधीची वाट पाहत होते. त्यांना संधी दिली पत्राचाळ प्रकरणानं,असं शरद पवार म्हणाले.
पत्राचाळीमध्ये कष्ट करणारे मध्यमवर्गीय लोक राहत होते. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, त्या चाळकऱ्यांना घरं मिळावी अशी मागणी त्यांची होती. ते संजय राऊत यांच्याकडे पोहोचले. संजय राऊत यांच्या नेहमीच्या लिखाणानं दुखावलेल्या शासकीय यंत्रणेला संधी मिळाली, असं शरद पवार म्हणाले. ईडीचं योगदान या प्रकरणात अधिक आहे. ईडीनं केलेल्या केसमध्ये संजय राऊत यांचा संबंध नसताना गुंतवलं गेलं. जिथं अन्याय होतो, अत्याचार होतो तिथं सामना उभा राहतो. शासकीय यंत्रणेत भ्रष्टाचार आहे, त्याच्या विरोधात ते नेहमीच लिहितात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे, असं त्यांनी म्हटलं.
58 कोटींच्या प्रकरणांची माहिती अन् संजय राऊतांची अटक
मुंबई , <एक शीर्षक ="महाराष्ट्र" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/maharashtra" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">महाराष्ट्रात काही लोक चुकीचं काम करत होते, हे माहीत असताना त्यांच्या संबंधी कारवाई होत नव्हती. संजय राऊतांनी खासदार म्हणून देशाच्या प्रमुखांना पत्र लिहिलं. जे लोक शासकीय यंत्रणा यांच्याशी भ्रष्टाचाराच्या मार्गानं संबंध ठेवतात, अशा लोकांमार्फत पैसे कसे गोळा केले जातात याचं सविस्तर लिखाण केंद्र सरकारला कळवलं, असं शरद पवार म्हणाले. त्या प्रकरणात 30 ते 35 लोक असे होते, कंपन्या होत्या, त्यांच्याकडून पैसे काढले गेले, ती रक्कम 58 कोटींच्या आसपास होती. ही माहिती संजय राऊतांच्याकडे आल्यानंतर त्यांनी देशाच्या प्रमुख लोकांना लिखित स्वरुपात दिली, त्याचा परिणाम एकच झाला, कारवाई झाली नाही पण त्यांना आत जावं लागलं. संजय राऊत यांना अटक झाली, त्याबद्दल पुस्तक लिहिण्यात आलंय, असं शरद पवार म्हणाले.
एकनाथ खडसेंच्या जावयाला संबंध नसताना अटक
संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलं त्यामुळं आम्हा लोकांना तिथली स्थिती कळेल. ती स्थिती दुरुस्त करण्याचा विचार आज ना उद्या करावा लागेल. जेलमधील आठवणी आणि अनेक भेटीगाठी, त्यांचा अनुभव लक्षात घेण्यासारखा आहे, असं शरद पवार म्हणाले. एकनाथ खडसे आमचे सहकारी, त्यांचे जावई इंग्लंडमध्ये होते, टाटा कन्सलटन्सी कंपनीत मोठ्या पदावर होते. खडसेंवर तक्रार झाली, त्यांना त्रास होईल असं कळताच त्यांचे जावई लंडनमधून इथं आहे. इथं आले हे कळताच त्यांना ईडीनं अटक केली. काही संबंध नसताना अटक केली गेली. अनिल देशमुख यांच्यावर एका शासकीय अधिकाऱ्यानं तक्रार केली 100 कोटीच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची, केस उभी राहिली तेव्हा 1 कोटीच्या भ्रष्टाचाराची केस उभी राहिली. आरोप करणाऱ्या व्यक्तीवर राज्य सरकारनं भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई केली होती. भोसलेंचा उल्लेख केला गेला, सगळी मंडळी त्रास होता पण नमली नाहीत, एकत्र राहिली, एकमेकांना धीर देत राहिली, त्या संकटातून ते बाहेर कसे निघतील याची काळजी घेतली गेली, असं शरद पवार म्हणाले.
Comments are closed.