निवडणूक आयोग त्यांचं काम योग्य पद्धतीनं करत नाही, शरद पवार यांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार, बोगस मतदान व मतदारांची दुबार नावं या संपूर्ण गैरप्रकारावर प्रकाश टाकणारी महत्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शिरूर- हवेली आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी घोटाळ्याचा पुराव्यांसह उलगडा करण्यात आला. तसेच, राज्यातील इतरही मतदार संघांतील मतदार यादी घोटाळा प्रसार माध्यमांसमोर मांडण्यात आला आहे.आयोगाच्या माध्यमातून कशाप्रकारे मतदारसंघात मत चोरी करण्यात आली यासंदर्भातील प्रात्यक्षिक शिरूर मतदार संघातील उमेदवार अशोक बापू पवार तर हडपसर मतदार संघातील उमेदवार प्रशांत जगताप यांनी दाखवले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही. निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. मात्र त्यांनी त्याची भूमिकाजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. निवडणूक आयोगाकडून आमची फार काही अपेक्षा नाही आहे असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, राहुल गांधी यांनी हे सर्व सत्य समोर आणलं, मात्र याची सुरुवात बिहारमधून झाली. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा गौरव सुरू आहे. बिहार आर्थिकदृष्या अडचणीचं राज्य आहे. त्यांचे काही प्रश्न असतील मात्र राजकियदृष्ट्या ते राज्य जागरूक आहे आणीबाणच्या काळात पहिला संघर्ष बिहारमद्ये झाला होता. राहुल गांधी यांच्या माहितीत एका झोपडपट्टीत एका घरात 140 लोकं राहत असल्याचे समोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यातील मतदारयाद्यांचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे, असे शरद पवार यांनी बोलताना म्हटले आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, आम्ही सगळ्यांनी मिळून दोन ते तीन नावाची चर्चा केली. त्यानंतर सर्वांचं एकमत झालं. सत्ताधाऱ्यांकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत म्हणून सहकार्य करावे ही विनंती केली. तथापि, मी शक्य नाही म्हटलं असल्याचे ते म्हणाले कारण ते वेगळ्या विचाराचे आहेत. मुख्यमंत्र्याच्या विनंतीवर मी शक्य नसल्याचे सांगितले. राऊतांशी बोलणं झालं असून त्यांचीही चर्चा झाली. त्यांचा आणि आमचा निर्णय एकच आहे. आम्ही आमचं बघतो त्यांनी काय करायचं ते ठरवतील, निकाल वेगळा लागेल. आम्ही सरकारचा विचार करत नाही. गेल्यावेळी 300 खासदार रस्त्यावर उतरले. आम्हाला अटक करण्यात आली. असेही शरद पवार यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले की, मतदारयादीत एका घरात 18 नावं असून एका घरात दुसरं कोणी आहे. काही ठिकाणी घरांसमोर 0 त्या पुढे 00 असं दिसतं. जिल्हाधिकाऱ्यांना सांगूनही आता तेवढा वेळ नाही हे उत्तर दिलं जातं. ही चांगली गोष्ट आहे की फडणवीसांनी हे मान्य केलं की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आमची अशी इच्छा आहे की, त्यांना मतदार याद्यांवर संशय असेल तर त्यांनी आमचा जो प्रयत्न सुरु आहेत, ज्यात सामील व्हायला हवं आणि निवडणूक आयोगाला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा असे जयंत पाटील म्हणाले.
जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यातील पराभूत झालेल्या मतदार संघात मतदानाची झालेली चोरी उघडकीस आणणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे स्वतः पुढाकार घेऊन ही चोरी उघडकीस आणणार आहे. प्रत्येक मतदारसंघात 10 ते 15 नावे घुसवली जात आहे. सध्या आमच्याकडे दोन मतदारसंघातील वास्तव माहिती उपलब्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात झालेले मतचोरी विरोधात जन आंदोलन उभारण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा पराभव कशाप्रकारे करण्यात आला याचा भांडाफोड करण्यात येईल. असे मुख्य प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले.
शिरूर विधानसभा मतदारसंघातील विधानसभेचे उमेदवार अशोक बापू पवार यांनी मतदार संघातील मत चोरी संदर्भात माहिती देताना म्हटले की, मतदार संघातील केसनंद या गावांमध्ये 188 मतदारांची नोंद झालेली आहे. ग्राम विकास अधिकाऱ्यांकडून या संदर्भात माहिती विचारली असता क्रमांक एक मधील मतदार इथे राहत नसल्याचे सांगण्यात आले तसेच या मतदार यादीत मृत्यू असल्याचे देखील नावे नोंद आहे. तर अनेक जणांचे मतदार यादीत पुन्हा पुन्हा नाव असल्याचे देखील अशोक बापू पवार यांनी मतदार यादी दाखवत सांगितले आहे.
हडपसर मतदार संघात संदर्भात माहिती देताना प्रशांत जगताप म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये हडपसर मतदार संघातून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना 15000 चा लीड मिळाला होता. हडपसर मतदार संघात महायुतीचे उमेदवारांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून जून 2024 ते सप्टेंबर 2024 यादरम्यान हडपसर मतदार संघात 40,000 नाव नव्याने नोंदवण्यात आली आहे. हडपसर मतदार संघात 49 हजार मतदारांचा घोटाळा झालेला आहे. या मतदारसंघात माझा पराभव 7000 मतांनी झालेला आहे. या मतदारसंघात 43 हजार लोकांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केलेलं आहे यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडे अनेकदा तक्रार केलेली आहे. 17 A हा फॉर्म राज्य निवडणूक आयोगाकडे असतो आयोगाकडून या फॉर्म अंतर्गत कोणी मतदान केले या संदर्भातील माहिती देण्यास तयार नाही यासंदर्भात आम्ही अनेकदा राज्य निवडणूक आयोगाला विनंती आणि पत्र देखील लिहिले आहे. असे जगताप यांनी सांगितले.
यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, विधिमंडळ पक्षनेते आमदार जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय महिला अध्यक्षा व राज्यसभा खासदार फौज़िया खान, राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे, राज्याचे माजी मंत्री व पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रभारी हर्षवर्धन पाटील, खासदार निलेश लंके, माजी आमदार अशोक पवार, महिला प्रदेशाध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, पक्षाचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप,सचिन दोडके व विकास लवांडे हेदेखील उपस्थित होते. यावेळी निवडणूक
Comments are closed.